


अनिल साळवे, विशेष प्रतिनिधी मो. 86985 66515 गंगाखेड :-गंगाखेड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण आकृती पुतळ्यासमोर ओबीसी आरक्षण बचाव सभा पार पडली. यावेळी अँड.प्रकाश आंबेडकर यांनी बोलताना राजाच्या राजकारणात भडकाऊ राज्यकर्ते व राजकारणाची चलती वाढली आहे .या मुळे मराठा विरुद्ध ओबीसी वाद पेटवण्याची मोठी खेळी सुरू असून या दोन समाजामध्ये वाढत चाललेली दरी कमी करण्याचे उद्देशाने ओबीसी बचाव यात्रा काढण्यात आली आहे. अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अँड.प्रकाश आंबेडकर यांनी गंगाखेड येथील सभेत संबोधित करते वेळेस केले. तसेच आरक्षणाच्या प्रश्नावर बोलताना अँड. प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातल्या सध्या नेत्यांच्या गाड्या फोडण्याचे सत्र सुरू आहे परंतु चिल्लर कार्यकर्त्याच्या गाड्या फोडण्याची ऐवजी थेट राज्यकर्त्यासह नेत्याच्या मंडळाच्या गाड्या फोडण्याचे आवाहन केले यात मा.शरद पवार , मा.उद्धव ठाकरे,मा.एकनाथ शिंदे, मा.देवेंद्र फडवणीस, मा.अजित पवार, यांच्या गाड्या फोडा याशिवाय आरक्षणावर हे राज्यकर्ते बोलते होणार नाहीत. या वेळी सभेचे अध्यक्षस्थानी प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर होत्या,तर कार्यक्रमाचे उद्घाटन मा. डॉक्टर सिद्धार्थ भालेराव यांच्या हस्ते करण्यात आले. तर जिल्हा परिषद माजी सदस्य गोविंदराव राठोड अध्यक्ष स्थानी होते. या वेळी उपस्थित या त यात्रेच्या समन्वयक रमेश फड, मनोहर व्हावळे,जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भगवान सानप, दिंगाबर घोबळे, मनसे नेते बालाजी मुंढे, लक्ष्मण मुंढे, उपसभापती बालाजी पोले, व वंचित व ओबीसी चे नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.













