Home यवतमाळ शेतकरी बांधवांनी ई केवायसी करून घ्यावी

शेतकरी बांधवांनी ई केवायसी करून घ्यावी [तहसिलदार आर. यु. सुरडकर यांचे शेतकरी बांधवांना जाहीर आवाहन]

213

 

✒️ सिध्दार्थ दिवेकर (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) मो.9823995466

उमरखेड:- (दि.28 जून) उमरखेड तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना कळविण्यात येते, आपल्या तालुक्यातील बरेच शेतकरी बांधव हे केवायसी नसल्यामुळे अनुदानापासून वंचित आहेत. त्यांनी आपली पेंडिंग केवायसी करून घेतल्यास त्यांना त्यांच्या अनुदानाचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे पेंडिंग इ केवायसी मध्ये ज्या शेतकरी बांधवांची नावे आहेत. त्यांनी मंडळ अधिकारी तलाठी/ कोतवाल यांच्या कडून vk नंबर प्राप्त करून आपल्या गावातील CSC सेंटर आपले सरकार सेवा केंद्र ग्रामपंचायत ऑपरेटर यांच्या कडे आपली इ के वाय सी लगेच करून घ्यावी.त्यानंतर आपली मदत शासनस्तरावरून आपल्या खात्यात थेट जमा होईल.
दिनाक 29 जून 2024 पर्यंत इ केवायसी करायची आहे.

तरी शेतकरी बांधवांनी ई केवायसी करून घ्यावी असे उमरखेड तहसिल प्रशासनाच्या वतीने तहसिलदार आर. यु. सुरडकर यांनी आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here