Home यवतमाळ ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ पत्रकार संघटनेची सर्वसाधारण सभा संपन्न

‘व्हॉइस ऑफ मीडिया’ पत्रकार संघटनेची सर्वसाधारण सभा संपन्न

291

 

✒️ सिध्दार्थ दिवेकर (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) मो.9823995466

यवतमाळ (दि. 21 जून) येथील विश्रामगृह येथे दि. 20 जून रोजी व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटना यवतमाळ शाखेची सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली.

सदर सभेचे अध्यक्षस्थानी व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हा अध्यक्ष संजय राठोड उपस्थित होते.
तर प्रमुख अतिथी म्हणून राज्य संघटक सुरज पाटील अगत्याने हजर होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे प्रसिद्धीप्रमुख अरुण बरडे यांनी केले.
सदर सर्वसाधारण सभेमध्ये विविध विषय चर्चिल्या गेले. त्यामध्ये व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेच्या वतीने संभाव्य संघटनेच्या सदस्यांच्या दहावी आणि बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच आरोग्य शिबीर, पॉलिसी काढणे सोबतच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र, ओळखपत्र आणि सामाजिक उपक्रम राबविण्याबाबतचा आढावा व सदर विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी विशेष पुरस्कार प्राप्त पुसद तालुकाध्यक्ष समाधान केवटे, जय राठोड, विश्वास काळे, सचिन उबाळे, दिनेश करमुले, अब्दुल शेख, गणेश राऊत, प्रेमदास चव्हाण, संतोष मामिडवार, राजेश धोटे, अरुण बरडे आणि पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here