Home महाराष्ट्र दिवसा ढवळ्या वाळू चोरी गोदावरी नदी पात्रात भरते वाळू चोरांची जत्रा

दिवसा ढवळ्या वाळू चोरी गोदावरी नदी पात्रात भरते वाळू चोरांची जत्रा

323

अनिल साळवे, विशेष प्रतिनिधी मो. 86985 66515
गंगाखेड :- गोदावरी नदी पात्रातील पाणी पूर्णपणे आटल्याने उघड्या पडलेल्या वाळूचा उपसा करण्यासाठी भरदिवसा वाळू चोरांची ट्रॅक्टरसह , कामगार घेवून नदी पात्रात वाळू चोरांची बिंधास्त पणे वाळू उपसा करतात. महातपुरी येथे अवैधरित्या वाळू उपसा होत असल्याची माहिती मिळाल्याने कार्यवाही करण्यासाठी निघालेले पथक महातपुरीच्या दिशेने येत असल्याची कुणकुण लागताच वाळू चोर ट्रॅक्टरसह नदीतून पळ काडला या मुळे पथकाला रिकाम्या हाताने परतावे लागल्याचा प्रकार घडला आहे.
गंगाखेडच्या महातपुरी येथील प्रकार
नियमबाह्य चलणारा शासकीय वाळू धक्का बंद करण्याची मागणी तालुक्यातील सुजाण नागरिकांतून होत आहे.
पाऊस कमी प्रमाणात झाल्याने सध्या कडाक्याचे ऊन पडत असल्यामुळे गंगाखेड तालुक्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीचे पात्र पूर्णपणे कोरडेठाक पडून नदी पात्रातील वाळू मोठ्या प्रमाणात उघडी पडल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळत आहे. तालुक्यातील धारासुर शिवारातील खडका बंधाऱ्याच्या पायथ्यापासून ते मैराळसावंगी, गौडगाव, चिंचटाकळी, आनंदवाडी, खळी, महातपुरी, दुस्सलगाव शिवारातील मुळी बंधारा, भांबरवाडी, मुळी, धारखेड, गंगाखेड शहर, रेल्वे पुलाच्या खालील बाजूने व झोला, पिंप्री, नागठाणा तसेच मसला शिवारापर्यंत गोदावरी नदी पात्रातील खुल्या झालेल्या वाळूचा उपसा करण्यासाठी वाळू चोरांची एक प्रकारची स्पर्धाच लागली आहे.
दिनांक १४ मे रोजी रात्री अवैध वाळू उपस्याविरुद्ध कार्यवाही करण्यासाठी गेलेल्या महसुलच्या बड्या अधिकाऱ्यास अडवून त्यांच्यासोबत वाळू चोरांनी केलेली शाब्दिक चकमकीची घटना घडल्याने झोला शिवारात झोला पाटीवर महसुलच्या वतीने बैठे पथक बसविल्याने येथील अवैध वाळू उपस्याला काही प्रमाणात लगाम लागल्याचे जाणवत असतानाच वाळू उपस्यासाठी वाळू चोरांनी आपला मोर्चा महातपुरीकडे वळवून दिनांक १८ मे शनिवार रोजी भरदिवसा अवैध वाळू उपसा सुरू केल्याची माहिती काही पर्यावरण प्रेमींनी महसूल प्रशासनाला दिली. महसूल प्रशासनाचे नायब तहसीलदार मोहम्मद अजीम, मंडळ अधिकारी अंगद आळसे, तलाठी गजानन फड आदींचे पथक कार्यवाही करण्यासाठी महातपुरीच्या दिशेने निघाल्याची कुणकुण वाळू तस्करांना लागताच त्यांनी ट्रॅक्टरसह गोदावरी नदी पात्रातून पळाले ,या मुळे या पथकाला रिकाम्या हाताने परतावे लागले.
महातपुरी येथे गोदावरी नदी पात्रातून अवैध वाळू उपसा होत असल्याने त्यावर कार्यवाही करण्यासाठी महसूल प्रशासनाचे पथक महातपुरीच्या दिशेने निघाल्याची माहिती वाळू चोरांना समजली कशी ? वाळू चोरांना माहिती देणारा कोण असा प्रश्न येथे उपस्थित असलेल्या पर्यावरण प्रेमी नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.
नियमबाह्य चलणारा शासकीय वाळू धक्का बंद करण्याची मागणी
घरकुल धारकांसह गरजू बांधकाम धारक लोकांना शासकीय दरात वाळू मिळावी यासाठी तालुक्यातील मैराळसावंगी व धारासुर येथे दोन शासकीय वाळू धक्के सुरू करण्यात आले आहे. नियमांची पायमल्ली करून या वाळू धक्क्यावर कुठली ही नोंद न ठेवता नियमबाह्यरित्या चढ्या दरात वाळूची विक्री केली जात आहे. ऑनलाइन नोंदणी केल्यानंतर येथून शासकीय दरात वाळू उपलब्ध होईल असे प्रशासनाकडून सांगितल्या जात असेल तरी मात्र वाळूची ऑनलाईन बुकींगच होत नसल्याने सर्वसामान्य घरकुल धारक व गरजू बांधकाम धारकांना चढ्या दरात वाळू खरेदी करावी लागत असल्याने नियमांची पायमल्ली करून नियमबाह्य चालणाऱ्या धारासुर व मैराळसावंगी येथील शासकीय वाळू धक्क्याचे टेंडर रद्द करून हे वाळू धक्के बंद करावे अशी मागणी तालुक्यातील सुजाण नागरिकांतून केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here