Home यवतमाळ सरोज देशमुख यांच्यावरील तडीपराची केलेली कारवाई रद्द करावी सकल मराठा समाज...

सरोज देशमुख यांच्यावरील तडीपराची केलेली कारवाई रद्द करावी सकल मराठा समाज व मराठा सेवा संघ तर्फे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन निवेदनातून मागणी

131

 

✒️ सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी, यवतमाळ) मो.9823995466

उमरखेड :- (दि. 2 एप्रिल)
सकल मराठा समाजाच्या भगिनी जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश सहसचिव सरोज देशमुख यांच्यावर शासनाने केलेल्या सूडबुद्धीने कारवाईच्या निषेधार्थ सकल मराठा समाज उमरखेड व मराठा सेवा संघ उमरखेड च्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालय उमरखेड यांना निवेदन देण्यात आले.

मागील तीन वर्षापासून गंभीर गुन्हे असलेल्या कोणत्या गुन्हेगाराला तडीपार केलं नाही परंतु एक सामाजिक कार्यकर्ता समाजासाठी आपल्या घरावर तुळशी पत्र ठेवणारी एक महिला मराठा आरक्षणासाठी लढणारी एक रणरागिणी यांच्यावर तडीपराची नोटीस देऊन त्यांच्यावर अत्याचार करण्यात आलेला आम्ही समाज विसरणार नाही हा सर्व समाजाचा अपमान आहे.

अशा प्रकारची प्रतिक्रिया सकल मराठा समाज मराठा सेवा संघाच्या वतीने निवेदन देताना करण्यात आली तसेच उपविभागीय अधिकारी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना आपल्या भावना पोहोचवल अशा प्रकारचे आश्वासन देण्यात आले.

सरोज देशमुख यांच्या आंदोलने ही समाज हिताचे होते.
कोणत्याही प्रकारचे खंडणी किंवा व्यापाऱ्यांना त्यांनी वेटीस धरले नाही मग अशा प्रामाणिक कार्यकर्त्यावर अन्यायकारक घटना घडणे हे समाजमनाला सुन्न करणारी घटना आहे.

एकीकडे महिलांना 50 टक्के आरक्षण सरकार देत आहे आणि दुसरीकडे महिलावर जाणून-बुजून अत्याचार करत आहेत याचा कुठेतरी सत्ताधाऱ्यांनी विचार करावा अशा प्रकारची भावना मराठा कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केली.

यावेळी सकल मराठा समाजाचे व मराठा सेवा संघाचे उमरखेड, महागाव, हदगाव तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here