


पुसद प्रतिनिधी
दिनांक 23/03/2024 रोजी आसोलीकरांच्या ऐतिहासिक लढ्याला यश मिळाल्या बद्दल पुसद तालुक्यातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी आसोलीमध्ये येऊन गावकऱ्यांचा जाहीर सत्कार केला.
चाळीस वर्षापासूनच्या पाणीटंचाईचे संकट गावातील निडर स्वाभिमानी लोकांनी तीन वर्षात दूर केले याबद्दल प्रमुख उपस्थित मान्यवरांनी गावकऱ्यांचे तोंड भरून कौतुक केले. त्यांनी इथे प्रकर्षाने नमूद केले की पुसद तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये जर अशा लीडर स्वरूपाचे नागरिक तयार झाले तर या पुसद नगरीचा निश्चितच विकास होईल. यावेळी सर्व लढवय्या महिलांचा हार घालून व संत सेवालाल महाराजांची प्रतिमा देऊन सत्कार केला तसेच ग्रामपंचायत च्या नेतृत्वाखाली हा लढा देणाऱ्या ग्रामपंचायत च्या सर्व सन्माननीय सदस्य व सरपंच यांचा सत्कार केला.
यावेळी बोलतांना बुद्धरत्न भालेराव यांनी यशवंत कोल्हे या सुशिक्षित तरुणाला साथ देऊन गावकऱ्यांनी खूप मोठे काम केले व गावकऱ्यांनी आपल्या सरपंचाला नेहमी अशीच साथ देत रहावी अशी भावना व्यक्त केली. हा सत्कार पाहून गावातील सर्व महिला भारावून गेल्या त्यांच्या डोळ्यातील आनंद अश्रू थांबत नव्हते.
सत्कार करण्यासाठी पुसद वरून मनिष जाधव,बुद्धरत्न भालेराव,शाकिब शहा,विजय बाबर, जयानंद उबाळे, ऋषिकेश जोगदंडे, संदीप आढाव,सचिन नंदागवळी,ज्ञानेश्वर मिरासे, गजानन लेकुरवाळे,नारायण आढाव,दत्ता कुरकुटे आदी मान्यवर उपस्थित होते.














