Home यवतमाळ पोलीस स्टेशन अंतर्गत सुरू असलेले अवैद्य धंदे बंद न केल्यामुळे आमरण उपोषणाला...

पोलीस स्टेशन अंतर्गत सुरू असलेले अवैद्य धंदे बंद न केल्यामुळे आमरण उपोषणाला बसणार – शाम धुळे (जिल्हा कार्याध्यक्ष भीम टायगर सेना)

174

 

 

✒️ सिध्दार्थ दिवेकर (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) मो.9823995466

 

उमरखेड (दि.१२ मार्च) पोलीस स्टेशन अंतर्गत सुरू असलेले अवैध जुगार व मटका त्वरित बंद करण्यात यावा.

खुलेआम सुरूवातीला जुगारो मटक्यामुळे अनेक लोकांचे संसार उघड्यावर पडलेले आहेत रोज नवरा-बायकोमध्ये भांडणे सुरू आहेत. जुगार व मटक्यापायी तरुण पिढी वाईट मार्गाला लागून शहरात चोरीचे प्रमाण वाढले आहे.
म्हणून उमरखेड शहरात सुरू असलेला अवैधरित्या जुगार व मटका बंद करण्याची तक्रार उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय उमरखेड येथे दि. ७ मार्च रोजी देण्यात आले होते.

पण यावर संबंधित कार्यालयाने कोणतीही कारवाई केली नसल्यामुळे दिनांक १३ मार्च २०२४ रोजी दुपारी ४ वाजता अर्जदार शाम धुळे उपोषणाला बसणार आहे.
यात माझी जीवित हानी झाल्यास संबंधित प्रशासन जबाबदार राहील.
अशी माहिती भिम टायगर सेनेचे जिल्हा कार्याध्यक्ष शाम धुळे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here