Home यवतमाळ रस्त्यासाठी ग्रामस्थांनी दिले निवेदन

रस्त्यासाठी ग्रामस्थांनी दिले निवेदन

211

 

✍🏻 सिध्दार्थ दिवेकर (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) मो.9823995466

उमरखेड:- (दि.18 जानेवारी) तालुक्यातील मेट गावांमध्ये ग्रामपंचायत च्या रस्त्यावर अतिक्रमण केल्यामुळे नागरिकांना करण्यासाठी वाहतुकीसाठी अडथळा निर्माण होत आहे.

मागील आठ ते दहा वर्षापासून या रस्त्याच्या तक्रारीचे निवेदन देऊन कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही. यामुळे शेतातील शेतमाल असेल किंवा घरासाठी लागणारे कोणतेही साहित्य घरी आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे.

तसेच घरापर्यंत बैलगाडी किंवा चार चाकी वाहन येऊ शकत नाही. त्यामुळे २०१३ व २०२१ असे दोन वेळेस निवेदन देऊन कोणत्याही प्रकारचे कारवाही झाली नसल्यामुळे नागरिक उपोषणाला बसण्याच्या तयारी केली आहे.

या रोडच्या कामांमध्ये वारंवार अडथळा निर्माण होत असल्यामुळे तरीही साहेबांनी लवकरात लवकर रस्ता मोकळा करून द्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

चार दिवसांमध्ये रस्ता खुला न झाल्यास तहसील कार्यालय उमरखेड या ठिकाणी आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा सुद्धा देण्यात आला.

यावेळी थावरा भिकू चव्हाण, मनोज किसन जाधव, गंगाराम चव्हाण, मांगीलाल मनीराम राठोड,अविनाश मनीराम राठोड, सुदाम नामदेव राठोड यांनी ग्रामपंचायत कार्यालय मेट, भूमी अभिलेख कार्यालय उमरखेड, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी जिल्हाधिकारी, यवतमाळ, आमदार, उपनिरीक्षक बिटरगाव यांना पत्र देऊन कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here