Home महाराष्ट्र आई वडिलांच्या स्मृतिपित्यर्थ रणपिसे कुटूंबाकडून वृक्षारोपण

आई वडिलांच्या स्मृतिपित्यर्थ रणपिसे कुटूंबाकडून वृक्षारोपण

265

*सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड) मोबा.9075686100*

 

म्हसवड : नाना रणपिसे आणि कमल रणपिसे पती पत्नी यांचा एकाच दिवशी येणारा स्मृती दिनाचा कार्यक्रम गोंदवले, ता. माण, जि. सातारा येथे वृक्षारोपण करून साजरा करणेत आला.
रणपिसे कुटुंब हे मूळचे गोंदवले बुद्रुक या गावाचे परंतु नोकरीं निमित्त ते मुंबई येथे पूर्वी स्थाईक झाले परंतु काही कारनामुळे आपल्या मूळ गावी येता आले नाही आपल्या बांधवाची असलेली नाळ तुटलेली आहे हे लक्षात आले आणि नाना रणपिसे यांची इच्छा आणि आपले कर्त्याव्य म्हणून त्याचा स्मृती दिनाचा कार्यक्रम त्याच्या मुलांनी आपल्या मूळ गावी गोंदवले येथे साजरा केला.
यावेळी त्यांच्या मुलांनी आदरांजली वाहताना आपल्या आई वडिलांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. आपले कर्त्याव्य म्हणून समाजासाठी बुद्ध विहाराला तिजोरी आणि 11000/- रुपये समाजासाठी धम्मदान म्हणून दिले.
यावेळी रणपिसे यांची मुले, मुली, नातवंडे धम्मबांधव, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार यांची उपस्थिती होती या कार्यक्रमानिमित्त रणपिसे कुटूंबाकडून भोजनदान देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here