Home महाराष्ट्र लॉयन्स क्लब गंगाखेड गोल्डसिटी तर्फे शिलाई मशीन वितरण

लॉयन्स क्लब गंगाखेड गोल्डसिटी तर्फे शिलाई मशीन वितरण

391

 

अनिल साळवे,विशेष प्रतिनिधी मो. 86985 66515

गंगाखेड- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त लॉयन्स क्लब गंगाखेड गोल्डसिटी तर्फे गंगाखेड शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या महिलेस शिलाई मशीन चे वितरण करुन एक पाऊल उचलण्यात आले याप्रसंगी बोलताना लॉयन्स क्लब गंगाखेड गोल्डसिटी चे सचिव भगत सुरवसे यानी लॉयन्स क्लब गंगाखेड गोल्डसिटी हा तळागळातील लोकांसाठी काम आम्ही करणार आहोत व समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यंत आमचा पोहचायचा प्रयत्न सुरू आहे. याप्रसंगी लॉयन्स क्लब गंगाखेड गोल्डसिटी चे संचालक लॉ.ओंकार भरड , लॉ.उमेश पापडु ,मुख्याध्यापक श्री लटपटे सर
चव्हाण सर, तांदळे मॅडम, मुंढे मॅडम, अंगणवाडी ताई शेख मॅडम, मुंढे काकू, घरजाळे काकू, मशीन मिळालेल्या संध्या होनमने चे पालक सौ सविता सोपान होनमने व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here