


✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)
गडचिरोली(दि.27मे):-स्थानिक आमदार विकास निधी योजनेअंतर्गत गोटूल बांधकामाकरिता तथा संरक्षण भिंत, प्रवेशद्वार, सौंदर्यीकरण, बोर सह सोलर पॅनल, नागरिकांसाठी (महिला- पुरुष) स्वच्छतागृह याकरिता निधी उपलब्ध करून देण्याबाबत गोटूल बहुद्देशीय समिती आरमोरी यांची आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री रामदास मसराम यांच्या कडे केली आहे.
गोटूल बहुद्देशीय समिती आरमोरी गेली 22 वर्षापासून वडसा रोड वरील आरमोरी बर्डी स्थित कार्यरत आहे. सदर समिती अंतर्गत सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा विषयक, बौद्धिक तथा धार्मिक उपक्रम राबवीले जातात. या समितीच्या कार्याची दखल घेऊन मा. जिल्हाधिकारी गडचिरोली यांनी दिनांक ०८ नोव्हेंबर २००७ रोजी ०.३५ हेक्टर आर भूखंड मंजूर केले असून, सदर भूखंडाचा लाभ विविध उपक्रम साजरे करण्यासाठी होत आहे.
आदिवासी समाजाच्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा विषयक, बौद्धिक, धार्मिक, बहुउद्देशीय व रचनात्मक विकास घडवून आणण्यासाठी शासनाच्या विकास निधीची व स्थानिक आमदार निधीची अत्यंत आवश्यकता आहे. तरी आदिवासी समाजाच्या विकासाची गरज लक्षात घेता, आपल्या स्थानिक आमदार विकास निधी अंतर्गत अनुदान मंजूर करावे व आदिवासी समाजाला उपकृत करावे. अशी मागणी गोटूल बहुउद्देशीय समिती आरमोरी तर्फे करण्यात आले आहे.
यावेळी समितीचे संस्थापक तथा सचिव प्रा. दौलत धुर्वे, सहसचिव डॉ दिलीप कुमरे, श्री संजय कुमरे, श्री ईश्वर कोल्हे, श्री राजू परसा, संजय गावडे, मंगेश मडावी आदी गोटूल बहुउद्देशीय समितीचे सदस्य उपस्थित होते.















