Home महाराष्ट्र आंधळीच्या मल्लाची गल्ली ते दिल्लीपर्यंत गरुडझेप! महाराष्ट्राला रौप्यपदक;गणेश गोरे मानकरी

आंधळीच्या मल्लाची गल्ली ते दिल्लीपर्यंत गरुडझेप! महाराष्ट्राला रौप्यपदक;गणेश गोरे मानकरी

215

*सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड) मोबा.9075686100*

 

म्हसवड : आंधळी ता.माण येथील मूळ राहिवासी असलेल्या गणेश गोरे याने दिल्ली येथे पार पडलेल्या नॅशनल चॅम्पियनशीप २०२३-२४ स्पर्धेमध्ये महाराष्ट्राकडून ८० किलो वजनी गटात रौप्यपदक मिळवले आहे.

माण तालुक्यासारख्या ग्रामीण भागातून कुस्तीचे धडे घेत पुणे,सांगलीत सराव करत गणेश गोरेने कुस्तीला सुरुवात केली.दिवसातून चार-पाच तास व्यायामाचा सराव करून शरीरयष्टी मजबूत केली.माण तालुक्यासह सातारा जिल्ह्यातील यात्रेनिमीत्त असलेल्या बऱ्याचशा कुस्ती मैदानात विरोधी मल्लास चितपट करून विजयश्री खेचून आणला होता.गतवर्षी शिरताव केसरी गदेचा मान त्याने पटकावला होता.कुठूंबीय शेतकरी असूनही या क्षेत्रात वेगळे स्थान निर्माण करण्याचा निर्णय घेऊन त्याने वेळेचे योग्य नियोजन व सरावाचे वेळापत्रक तयार करत त्याप्रमाणे त्याने कष्ट घेतले.

यावेळी बोलताना पै.गणेश गोरे म्हणाला की,कुठूंबातील कोणताही सदस्य मल्ल नसताना माण सारख्या दुष्काळी व ग्रामीण भागातून शहरी भागात जाऊन सराव करताना अनेक अडचणी आल्या.तरीही ‘घेतला वसा,टाकू नका’ या म्हणीप्रमाणे कितीही अडचणी आल्या तरी मागे न हटता अखंड परिश्रम करत राहणार,उद्दिष्टपुर्ती साठी प्रयत्न करणार माण तालुक्यातील धावपटू ललिता बाबर,पै.किरण भगत यांच्यासारख्या सर्वसामान्य खेळाडूंचा आदर्श घेऊन या क्षेत्रात आलो.कष्ट प्रामाणिक असतील तर यश मिळतेच,त्याचे उत्तम उदाहरण ते दोघे आहेत.असेही तो म्हणाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here