Home महाराष्ट्र मोर्शी तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार २ कोटी ५० लाख रुपयांचा विमा...

मोर्शी तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार २ कोटी ५० लाख रुपयांचा विमा परतावा ! फळ पिक विम्याचे अनुदान शेतकऱ्यांचे खात्यावर जमा होणार — आमदार देवेंद्र भुयार संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी मानले आमदार देवेंद्र भुयार यांचे आभार !

300

 

मोर्शी तालुका प्रतिनिधी /
मोर्शी तालुक्यातील हजारो संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी हेक्टरी १२ हजार रुपये भरून २०२२ – २३ मध्ये आंबिया बहार संत्रा फळ पिक विमा मोठ्या प्रमाणात काढलेला होता. मात्र रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीने अमरावती जिल्ह्यातील महसूल मंडळांच्या स्वयंचलित हवामान केंद्रावर आक्षेप घेऊन संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवण्याचा घाट रचत असल्यामुळे हजारो संत्रा उत्पादक शेतकरी फळ पीक विमा मदतीपासून वंचित राहणार असल्याचे आमदार देवेंद्र भुयार यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये लक्षवेधी मांडून शासनाच्या निदर्शनास आणून दिले होते.
आमदार देवेंद्र भुयार यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचा फळ पीक विम्याचा मुद्दा रेटून धरल्यामुळे मोर्शी तालुक्यातील फळ पीक वीमा धारक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून हिवरखेड महसूल मंडळातील शेतकऱ्यांना २ कोटी ५० लक्ष रुपयांचा विमा परतावा शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच जमा होणार असल्याची माहिती आमदार देवेंद्र भुयार यांनी दिली.
प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना 2022-23 अंतर्गत अंबिया बहारामध्ये मोर्शी तालुक्यातील हजारो संत्रा फळ पीक उत्पादक शेतकऱ्यांनी फळपिक विमा काढला होता. मात्र ५ महिन्यांचा कालावधी लोटून सुद्धा रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी संत्रा उत्पादक शेतकरी विमा मदतीपासून वंचित ठेवत असल्यामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे आस्मानी संकटामूळे झालेल्या नुकसानीची मदत संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना वाटप करण्यात यावी यासाठी आमदार देवेंद्र भुयार यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना प्रत्यक्ष भेटून पाठपुरावा केल्यामुळे आमदार देवेंद्र भुयार यांच्या मागणीची दखल घेऊन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीला मोर्शी तालुक्यातील हिवरखेड अंबाडा महसूल मंडळातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे फळ पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना देण्याचे निर्देश दिले असून विमा कंपनीने विमा धारक शेतकऱ्यांच्या खात्यात २ कोटी ५० लक्ष रुपये जमा करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार असल्याचे सांगितल्यामुळे मोर्शी तालुक्यातील शेकडो संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळनार आहे.
संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळून देण्यासाठी आमदार देवेंद्र भुयार यांनी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतली असता मोर्शी तालुक्यातील हिवरखेड मंडळ मधील २०२२ -२३ च्या संत्रा पीक विमा आंबिया बहाराच्या ६०० हेक्टर क्षेत्राचे २.५० कोटी रुपये विमा कंपनीने मंजूर केले असून अमरावती जिल्ह्यातील फळ पीक विम्यापसून वंचित असलेल्या इतर १४ महसूल मंडळाचा समावेश करण्याचे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी कृषी विभाग व विमा कंपनीला दिले असल्यामुळे मोर्शी तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी आमदार देवेंद्र भुयार यांचे आभार मानले.

प्रधानमंत्री फळ पिक विमा योजना सन २०२२-२३ मध्ये खरीप फळ पिकाखाली मोर्शी तालुक्यातील हजारो संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी सहभाग घेऊन फळ पिक विमा काढला होता फळ पीक विमा मंजूर होऊन राज्य हिस्सा आणि केंद्र हिस्सा रिलायन्स इन्शुरन्स कंपनीकडे जमा करून सुद्धा रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीने महसूल मंडळांच्या ट्रिगर वर आक्षेप घेतल्यामुळे शेतकऱ्यांना विमा रक्कम वेळेत मिळू शकली नव्हती याबाबत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे पाठपुरावा केला असता रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीने मोर्शी तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना २.५० कोटींचा मंजूर झालेला परतावा लवकरच संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार — आमदार देवेंद्र भुयार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here