


वरूड तालुका प्रतिनिधी /
दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार मित्र परिवार द्वारा भव्य आमदार चषक चित्रकला स्पर्धा २०२४ चे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामीण भागासह तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना बाव मिळण्याच्या अनुषंगाने दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. हि स्पर्धा ग्रामीण व शहरी अशा दोन गटात घेण्यात येणार आहे. त्यामध्ये शनिवार दि. १३ जानेवारी २०१४ रोजी ग्रामीण भागात तर रविवार दिनांक १४ जानेवारी, २०२४ रोजी शहरी भागात अशा दोन टप्प्यात “भव्य आमदार चषक चित्रकला स्पर्धा २०२४” आयोजित करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील विद्याथ्र्यांच्या परीक्षा शिकत असलेल्या शाळेत होणार असून वरुड शहरातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा स्थानिक न्यु इंग्लिश हायस्कुल वरुड, ता. वरुड, जि. अमरावती येथे भव्य प्रांगणात होणार आहे.
चित्रकला स्पर्धा सर्व विद्यार्थ्याकरीता विनामुल्य राहणार असून चित्र रेखाटनाकरीता विनामुल्य ड्राईंग शीट पुरविल्या
जाणार आहेत. यात सहभागी सर्व विद्यार्थ्यांना आकर्षक बक्षिस स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र देण्यात येणार असून प्रत्येक गटास प्रथम, द्वितीय, तृतीय अनुक्रमे रोख रक्कम ३००१/- रुपये, २००१/- रुपये, १००१/- रुपये देण्यात येणार आहे. त्याशीय प्रोत्साहनपर बक्षिस सुध्दा देण्यात येणार आहे. यास्पर्धेचे बक्षिस वितरण गरुवार दि. ०१ फेब्रुवारी २०२३ रोजी आमदार देवेंद्र भुयार यांचे कार्यालय वरुड येथे स. १०.०० वाजता होणार आहे. हि चित्रकला स्पर्धा संपूर्णतः विनामुल्य राहणार असून प्रमुख अतिथी म्हणून श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धनदादा देशमुख तसेच मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्रजी भुयार उपस्थित राहणार आहे. विशेष उल्लेखनिय कलाक्षेत्रात योगदान असलेल्या शिक्षकांना कलाश्री पुरस्काराने सम्मानित करण्यात येणार आहे.
यास्पर्धेच्या अधिक माहिती करीता कला शिक्षक वसीम शेख, समीर गौस अली, किशोर देशमुख, निळकंट नेरकर, शंकर पाटणकर, कपील तरार, रऊफ खान, शिवदास भंडारी, कुशल अंबाडकर, जगदीश लोखंडे, वैष्णवी राऊत आदींशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.













