Home यवतमाळ मातोश्री विद्यालय श्रीरामपूर चा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी मध्ये द्वितीय क्रमांक

मातोश्री विद्यालय श्रीरामपूर चा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी मध्ये द्वितीय क्रमांक

367

 

बाळासाहेब ढोले, विशेष प्रतिनिधी मो. 78751 57855

पुसद- शिक्षण विभाग पंचायत समिती पुसद यांचे द्वारा 51 वी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी दिनांक 21 व 22 डिसेंबर 2023 रोजी श्री शिवाजीराव मोघे माध्यमिक विद्यालय, हर्षी, ता. पुसद येथे आयोजित करण्यात आली होती.

या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीमध्ये मातोश्री विद्यालय श्रीरामपूर येथील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. यामध्ये प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक गटातून प्रयोग प्रदर्शनी मध्ये सहभागी करण्यात आले होते. माध्यमिक सर्वसाधारण गटातून मातोश्री विद्यालय श्रीरामपूर या शाळेतील कु. ज्ञानेश्वरी विष्णू मंदाडे या विद्यार्थिनीच्या शेतकरी संरक्षक काठी या प्रयोगाला द्वितीय क्रमांक प्राप्त होऊन या प्रतिकृतीची जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनी करता निवड झाली.

या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी मध्ये माध्यमिक विभागातून द्वितीय क्रमांक पटकाविणाऱ्या विद्यार्थ्यांना समारोपिय कार्यक्रमात मान्यवरांच्या वतीने गौरविण्यात आले. शाळेच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले. तसेच संस्थेचे संस्थापक डी. पी .जगताप यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here