Home यवतमाळ गावंडे महाविद्यालयात संत गाडगेबाबा यांच्या स्मृतीदिनी विनम्र अभिवादन

गावंडे महाविद्यालयात संत गाडगेबाबा यांच्या स्मृतीदिनी विनम्र अभिवादन

378

 

✒️ सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ) मो.9823995466

उमरखेड (दि.21 डिसेंबर)
येथील गोपिकाबाई सीताराम गावंडे महाविद्यालत संत गाडगेबाबा यांच्या स्मृतिदिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

विद्यार्थ्यांसाठी संत गाडगेबाबा यांच्या दशसूत्री वर आधारित निबंध स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
बऱ्याच विद्यार्थ्यांनी स्पर्धेसाठी भाग घेतला होता.

सकाळी संत गाडगेबाबा यांच्या फोटोला हार घालून अभिवादन करण्यात आले. त्याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य, प्रशासकीय कर्मचारी, सर्व प्राध्यापक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.

याप्रसंगी महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी प्रमोद ज्ञानेश्वर शिंदे याने संत गाडगेबाबा यांच्या दिनचर्या बद्दल व कार्याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली व सांगितले की कणकण करुनी कोटी केले, कण न खर्चिला स्वहितासाठी, वणवण फिरुनी कणकण झिजले, बाबा दुःखी जनतेसाठी झाडूने परिसर आणि कीर्तनाने मनं साफ करणारे असे संत गाडगे महाराज.

याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधवराव बा. कदम यांचेकडून मार्गदर्शन लाभले.
तसेच प्रतियोगितेसाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रो. डॉ. प्रशांत अनासाने प्रा. ए.पी. मिटके, प्रा. एस. एस. पाचकूडके, प्रा. ए. एस. जोशी ,प्रा. डॉ. के. बी. शिर्से, प्रा. डॉ. बी. एम. सावरकर उपस्थित होते.

कार्यक्रमात सर्व विद्यार्थ्यांचा सहभाग होता त्यासोबतच विशेषतः राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले व सर्व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here