


✒️ सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ) मो.9823995466
उमरखेड (दि.17 नोव्हेंबर) दिवस-रात्र राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे काम करताना दिसून येत असल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते साहेबराव कांबळे (बेलखेडकर) यांची “राजीव गांधी पंचायत राज संघटन महाराष्ट्र प्रदेश” महासचिव पदी निवड झाल्याबद्दल उमरखेड महागाव विधानसभा क्षेत्रातुन शुभेच्छांचा वर्षाव कांबळे यांच्यावर होत आहे. निवड झाल्यामुळे काँग्रेस पक्षामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
साधा आणि सरळ असलेले दानशूर, गरिबांना मदत करणारे हुशार व्यक्तिमत्व, सामान्य जनतेच्या समस्यांना वाचा फोडणारे,कर्तव्यदक्ष अधिकारी असलेले सामाजिक कार्यकर्ते साहेबराव कांबळे (बेलखेडकर) यांनी मागील एक वर्षापूर्वी उमरखेड महागाव विधानसभा क्षेत्रामध्ये मुंबई येथून आलेले कांबळे साहेब यांनी विधानसभा क्षेत्रामध्ये सामाजिक व राजकीय क्षेत्रात पदार्पण केल्यामुळे त्यांची आज “राजीव गांधी पंचायत राज संघटन” महाराष्ट्र प्रदेश महासचिव पदी निवड करून त्यांना पक्षामार्फत काम करण्याची महत्वपूर्व संधी दिली आहे.
कमी वेळा मध्येच मतदार संघातील जनतेच्या आणि मतदारांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी प्रत्यक्ष मतदारांना कांबळे यांनी भेटी गाठी करून आपली लक्षणीय ओळख विधानसभा क्षेत्रामध्ये निर्माण केली आहे.
पण या अगोदर आमदारकीच्या उमेदवारीसाठी कोणत्याही नेत्याने एवढी धडपड केली नाही किंवा विधानसभा क्षेत्रामध्ये होणाऱ्या हालचाली मतदाराच्या समस्यांपर्यंत ते पोहोचू शकले नाहीत.
पण कांबळे यांनी स्वतःला जनतेचा सेवक म्हणून काम करण्याची इच्छा मनात ठेऊन कार्य करण्याला सुरुवात केली आणि मोठ्या प्रमाणात तरुण वर्गाला आपल्या सहकार्यात ओढून घेतले असे दिसत आहे.
त्यामुळे उमरखेड व महागाव तालुक्यात कांबळे यांचीच चर्चा जोर देत असून भावी आमदार म्हणून लोकांची पहिली पसंत म्हणून आत्ताच कांबळे यांना आमदार म्हणून स्वीकारण्याची चर्चा विधानसभा क्षेत्रात दिसून आहे.
ही चर्चा इतर उमेदवारापर्यंत ही पोहोचली असून त्यांच्यामुळे कांबळे यांना विधानसभा निवडणुकीत रोखणे अवघड झाल्यासारखे दिसत आहे.
कांबळे यांनी सोशल मीडिया तसेच वृत्तपत्र यांच्या मदतीने आपले नाव कमी वेळामध्ये मतदारसंघात नावलौकिक केले आहे.
येणाऱ्या विधानसभा मतदार संघामध्ये कांबळे हेच विजय होतील अशी चर्चा जनते मध्ये आणि वृत्तपत्रे आणि सोशल मीडिया वर जोर देताना दिसत आहे.














