Home चंद्रपूर वनमंत्र्याच्या जिल्ह्यात बांबू कारागिरांना उपासमारीची वेळ-संतोष पटकोटवार

वनमंत्र्याच्या जिल्ह्यात बांबू कारागिरांना उपासमारीची वेळ-संतोष पटकोटवार

158

 

 

( सय्यद शब्बीर जागीरदार)

 

जिवती:-बूरूड कारागिरा़ना ऊतमरितीने जीवन जगता यावे यासाठी शासनाकडून बांबु कार्ड धारकांना वार्षिक पंधराशे नग हीरवा बांबू सवलती दरात पुरवठा करण्याचा शासन निर्णय आहे, मात्र वनविभागाकडुन शासन निर्णयाची योग्य रितीने अमलबजावणी होत नसल्याने बूरूड कारागिरांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे, सन 2014 पासून महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे, चंद्रपूरचे सन्माननीय वनमंत्री सूधिरभाऊ मुनगंटीवार हे दोनदा वनमंत्री झाले व चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधा झाले परंतु या आठ दहा वर्षांमध्ये एकदाही बुरुड कारागिरांना ऊतमरीतीचा समाधान कारक बांबूचा पुरवठा झाला नाही, तसेच मा,सूधिरभाऊ मुनगंटीवार यांच्या वनमंत्री पदाच्या कार्य काळात बुरुड कारागिरांना कोणत्याच प्रकारचा आर्थिक किवा शासकीय योजनांचा लाभ मिळाला नसल्याने बूरूड कारागिरांना बिकट परिस्थितीचा सामना करावा लागत असल्याचा घणाघाती आरोप शेतकरी संघटनेचे सरचिटणीस तथा चंद्रपूर जिल्ह्या बुरुड समाजाचे संघटन सचिव, संतोष पटकोटवार यांनी केला*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here