Home महाराष्ट्र दहिवडी येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनांनिमित्त धम्ममेळावा संपन्न

दहिवडी येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनांनिमित्त धम्ममेळावा संपन्न

361

सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड) मोबा.9075686100

म्हसवड : सदूसष्ट वर्षापूर्वी नागपूर येथे धर्मातर घडले अडीच हजार वर्षांपूर्वी मिळालेल्या कल्याण ज्ञानचे भगवान बुद्ध यांनी सारनाथ येथे पहिल्या पाच शिश्यांना केलेले धम्मज्ञान दान हे पहिले धम्मचक्र प्रवर्तन होते त्यानंतर सम्राट अशोकाचा काळ वगळता आधुनिक काळातील या धर्माणताराला धम्मचक्र प्रवर्तन असे मानले जाते या प्रवर्तनचे मुख्य कार्यकर्ते व ज्ञानदाते डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बाबासाहेबांनी सम्राट अशोका विजयादशमी दिवशी लाखो बौद्ध बांधवाना धम्म दिक्षा दिली या दिनाचे औचित्य साधून माण तालुक्यातील धम्म बांधवाचा धम्ममेळावा सिद्धनाथ मंगल कार्यालय दहिवडी येथे शेकडो बांधवाच्या उपस्थितीत पार पडला.
यावेळी सकाळी अकरा वाजतां बुद्ध विहार दहिवडी येथे बुद्ध वंदना घेणेत आली यावेळी बौध्दचार्य कुमार सरतापे यांनी त्रिशरण पंचशील दिले.
कार्यकमाच्या सुरवातिला सिधार्थ गायन पार्टी हिंगणी यांचा भीमगीताच्या बहारदार कार्यक्रमाने सुरुवात झाली प्रास्थाविक ऍड. बाळासाहेब सांवत यांनी केले सुरुवातिला बाळासाहेब रणपिसे यांनी उपस्थित धम्म बांधवाना बावीस प्रतिज्ञा दिल्या त्यानंतर माण तालुक्यातील बौद्ध समाजातील. गुणवंत विद्यार्थी आणि विविध क्षेत्रातील मान्यवराचा यावेळी पुष्पगुछ देऊन सत्कार करणेत आले.
या धम्ममेळाव्यास लोणंद येथे श्रमनेर शिबिरातील भन्ते यांची उपस्थिती मेळाव्यास लाभली धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे महत्व भारतीय बौद्ध महासंभा शाखा सातारा (पूर्व )चे जिल्हाध्यक्ष आयु. श्रीमंत घोरपडे सरांनी सांगितले. डॉ. वाघमारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी धम्ममेळाव्यास आयु. जीवन बनसोडे,तहसीलदार, जत यांनी भोजनदान दिले आयोजकाचे व तालुक्यातील धम्मबांधवाचे आभार बाळासाहेब रणपिसे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here