Home महाराष्ट्र विश्वदिप महाबोधी विहारात रामजीबाबा अभ्यासिकेचे उदघाटन

विश्वदिप महाबोधी विहारात रामजीबाबा अभ्यासिकेचे उदघाटन

323

 

बाळासाहेब ढोले, विशेष प्रतिनिधी

पुसद शहरालगत असलेल्या ग्रीनपार्क श्रीरामपूर येथील विश्वदिप महाबोधी बुद्धविहारात ६७ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून रामजी बाबा अभ्यासिकेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय श्रीरामपुर यांच्या वतीने मा.आमदार इंद्रनिल नाईक यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्वदिप महाबोधी विहार व डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष धम्मभुषण साहेबरावजी गुजर तर प्रमुख अतिथी म्हणुन माजी तहसिलदार क्रुष्णराव दिघाडे, रमेशजी सरागे उपस्थित होते.

सुरवातीला मा.आमदार इंद्रनिल नाईक यांच्या हस्ते पंचशिल ध्वजारोहण करून प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुजन करण्यात आले. सुजाता महिला मंडळाच्या उपासिकांनी वदंना घेतली. मा.आमदार इंद्रनिल नाईक यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवनावर सखोल मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषण साहेबरावजी गुजर यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वासुदेव आडोळे यांनी केले तर आभार प्रदर्शन सुभाष काजळे यांनी मानले.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सोपानराव वैराळे, प्रा.प्रमोद दवने, दशरथ गुढे, राजेंद्र इंगोले,तुकाराम चौरे,निळकंठ बोराडे,नामदेव पाईकराव, चंद्रकांत आठवले, यशवंत कांबळे तसेच सुजाता महिला मंडळाच्या उपासिकांनी सहकार्य केले. सरणतय गाथेने कार्यक्रमाची सांगता झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here