


आमचे चळवळीतील मित्र आणि जेष्ठ कामगार नेते मा. सागर तायडे साहेब यांचा प्रमोद हा सुपुत्र. मोठ्या झाडाखाली छोटी झाडे वाढत नाहीत अशी म्हण आहे.तायडे साहेबांनी रेशनिंग कृती समितीचा सदस्य फॉर्म भरला तेव्हा सत्यशोधक कामगार संघटनेच्या फॉर्म मध्ये संपर्क व्यक्ती म्हणून प्रमोद तायडे हे नाव दिले होते. मी प्रमोदला संपर्क करणे,पत्र पाठवणे, आमचे रेशन हे त्रैमासिक पाठवणे ही कामे करत होतो.प्रमोद बरोबर संपर्क राहिला पण फार भेटी झाल्या नाहीत. तायडे साहेबांनी मैत्री टिकवली होती.ते त्यांचा जॉब व कुटुंब सांभाळून देश पातळीवर कार्यरत होते. प्रमोद ने शिक्षण पूर्ण करून वकील झाला. प्रमोदने नुसते शिक्षण घेतले नाही तर सहकार क्षेत्रात करिअर घडवले. त्याच बरोबर सामाजिक बांधिलकी जपत कष्टकरी महिला वर्गाला विशेष घरकाम करणाऱ्या महिलांना संघटीत करून त्यांचे बचत गट तयार केले त्यांना आर्थिक आधार उभा केला. त्याच्या समता फाउंडेशनच्या माध्यमातून तो आज घर कामगार महिलांना व्यवसायिक प्रशिक्षण देऊन बँकांचे कर्ज उपलब्द करून देत आहे.लघु उद्योगातून तयार झालेल्या वस्तूंना मार्केट उपलब्ध करून देऊन त्यांना घरकामातून बाहेर पडून अधिक चांगल्या पद्धतीने सन्मानाने जगायला शिकण्यासाठी सर्वपरीने मदत करत आहे. त्याच्या टीम मध्ये आमचे मित्र कालिदास रोटे, रवींद्र सुर्यवंशी हे ही आपले व्यवसाय, कामे सांभाळून मदत करतात. तायडे साहेबांनी प्रमोदला दिलेले संस्कार आणि आंबेडकरी विचारांचा वारसा जपत प्रमोदची झपाटय़ाने घोडदौड सुरू आहे. वकील लोक आपला सेवा देण्याचा धंदा सोडून इतर कामात फारस लक्ष देत नाही. पण प्रमोद सहकार चळवळीतील विशेष वकील असून सुद्धा असंघटीत घरकाम करणाऱ्या महिलांसाठी काम करतो म्हणूनच संस्कार आणि आंबेडकरी विचारांचा वारसा जपणारा वकील.बापाचा असंघटीत कामगारांसाठी काम करण्यांचा वारसा चालवतो. खरे तर मित्राचा मुलगा पण आता मित्रच असलेल्या प्रमोद ला आनंदी,सुखी,निरोगी,दीर्घ आयुष्य लाभो याच सदिच्छा या निमित्ताने व्यक्त करतो.समता फाउंडेशन महिला बचतगट टीम लिडर लक्ष्मी छावडा चेंबूर यांच्या मुलांनी वीर छावडा सातवीत शिकतो याने ऍड प्रमोद तायडे यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने पोट्रेड काढला.आणि भेट दिला.घरकाम करणाऱ्या महिलांना मानसन्मान, न्याय हक्क अधिकार मिळवून देण्यासाठी समता फाउंडेशन प्रशिक्षण घेऊन महिलांच्या कला गुणांना वाव देण्याचे कार्य करते,त्यांचे बचतगट निर्माण करून त्यांना स्वयंरोजगार व उद्योजक बनविण्यासाठी क्रिर्याशील असते अशा यशस्वी वाटचाल करणाऱ्या बचतगटाच्या टीम लिडरनी समता फाउंडेशन अध्यक्ष ऍड प्रमोद तायडे यांचा वाढदिवस समता भवन विक्रोळी कार्यालयात उत्स्फूर्तपणे साजरा केला. तो लक्षवेधी व प्रेरणादायी ठरला.
रमेश कदम,
रेशनिंग कृती समिती मुंबई.
8796636861














