Home महाराष्ट्र थंडी चालू… अवैध रेती उत्खनन चालू तलाठी, सरपंच, पोलीस पाटील हे...

थंडी चालू… अवैध रेती उत्खनन चालू तलाठी, सरपंच, पोलीस पाटील हे निलंबित होणार काय?

158

कार्यकारी संपादक// उपक्षम रामटेके
📱9890940507
पावसाळा ऋतू समाप्त झाला आणि आता थंडीची चाहूल लागली आहे नदीच्या प्रवाहातून पाणी कमी झाल्यामुळे अवैद्य रेती उत्खननाला जोर आलेला आहे, अवैध रेती उत्खननामध्ये चिमूर तालुका अग्रेसर असून महाराष्ट्रात प्रथम क्रमांक द्यावा यापुढेही आग्रहाची विनंती असणार, कुठलीही कारवाई होत नसल्यामुळे चिमूर तालुक्यामध्ये अवैध रेती उत्खनन येथे जोमात चालू आहे, त्यामुळे हवामान खात्याकडे विनंती आहे की यापुढे हिवाळा ऋतू न ठेवता अवैध धंद्यांचा ऋतू अशी चिमूर तालुक्यामध्ये नोंद असावी, चिमूर तालुक्यामध्ये शासकीय बांधकाम कामांमध्ये सुद्धा अवैध रेती उत्खननाचा वापर होत असून संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष वारंवार होत आहे, त्यामुळे ज्या गावातून अवैध रेतीचे ट्रॅक्टर जातात त्या गावातील संबंधित पोलीस पाटील आणि सरपंच आणि त्याचबरोबर त्या सांज्यातील तलाठी यांना निलंबित करण्यात यावे यासाठी उद्या जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार दाखल करण्यात येणार आहे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here