Home यवतमाळ उमरखेड शहरामधील अवैद्य गुटखा व अवैद्य दारु त्वरीत बंद करा – सिध्दार्थ...

उमरखेड शहरामधील अवैद्य गुटखा व अवैद्य दारु त्वरीत बंद करा – सिध्दार्थ दिवेकर (शहराध्यक्ष भीम टायगर सेना)

460

✒️ जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ मो. 9823995466

उमरखेड (दि. 5 सप्टेंबर) शहरातील खुलेआम विक्री होत असलेला अवैध गुटखा व खुलेआम सुरु असलेली अवैद्य दारु मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे.

तसेच या अगोदरही छत्तीसगड येथून मराठवाड्यात जाणारा लाखो रुपयाचा गुटखा नागपूर – तुळजापुर महामार्गावर उमरखेड शहराजवळील नागेशवाडी येथे वाहनासह 49 लाखाचा गुटख्याचा माल यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेने पकडला होता.

पण मागील दिड महिण्यापासून अवैध गुटखा शहरात जोरात विक्री सुरु झाली आहे. तसेच अवैध रित्या विक्री होणारी दारु मोठ्या प्रमाणात दिसत आहे.
याकडे पोलिस प्रशासनाकडे दुर्लक्ष होतांना दिसत आहे.

तरी मा. यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांनी यांच्यावर कडक कार्यवाही करुन अवैध गुटखा व अवैध दारु त्वरीत बंद करण्यात यावे. अशी मागणी सिद्धार्थ ओमप्रकाश दिवेकर, शहराध्यक्ष भिम टायगर सेना, उमरखेड यांनी केली आहे.
यावेळी शाम धुळे जिल्हा कार्याध्यक्ष यवतमाळ, कैलास कदम तालुका अध्यक्ष उमरखेड हे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here