Home यवतमाळ पोफाळी येथील श्री शिवाजी विद्यालयच्या विद्यार्थिनींना सायकलचे वाटप (मानव विकास मिशन...

पोफाळी येथील श्री शिवाजी विद्यालयच्या विद्यार्थिनींना सायकलचे वाटप (मानव विकास मिशन अंतर्गत वाटप)

160

 

✒️ सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी, यवतमाळ) मो.9823995466

उमरखेड :- (दि. 29 ऑगस्ट)
श्री शिवाजी शिक्षण संस्था पुसद संचलित श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पोफाळी तालुका उमरखेड येथे मानव विकास मिशन अंतर्गत पोफाळी गावच्या आजूबाजूच्या खेड्यातील वसंत नगर, तांडा, दिवटपिंपरी ,जमुना, तरोडा, कळमुला या गावातील विद्यार्थिनींना सायकलचे वाटप करण्यात आले.

विद्यार्थिनींना शिक्षणाची सोय व्हावी या उदात्त हेतूने शासनातर्फे मानव विकास मिशन अंतर्गत दरवर्षी इयत्ता आठवीच्या विद्यार्थिनींना सायकलचे वाटप करण्यात येत असते.

श्री शिवाजी विद्यालय पोफाळीच्या बारा विद्यार्थिनींना विद्यालयाच्या चेअरमन श्रीमती विमलताई विश्वासराव शिलार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व सेवानिवृत्त शिक्षक एस.टी. सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली शाळा समितीचे सदस्य माणिकराव गोरे, प्राचार्य रोकडे. पर्यवेक्षक सादुडे सर रवी शिलार अवधूतराव देवसरकर व सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये 12 विद्यार्थिनींना सायकलचे वाटप करण्यात आले त्यामुळे त्यांची येण्या जाण्याची सोय होऊन त्यांचा शैक्षणिक विकास होण्याच्या दृष्टीने या कार्यक्रमाचे आयोजन केलं होते.

या कार्यक्रमाला विद्यालयातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी हजर होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here