


✒️ सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी, यवतमाळ) मो.9823995466
उमरखेड (दि. 25 जुलै) यवतमाळ जिल्हा परिषद अंतर्गत जलधारा योजनेतून उमरखेड तालुक्यातील नागापूर (रूपाळा) येथे पिण्याच्या पाण्याचे टाके होत आहे.
पण या पिण्याच्या पाण्याचे टाक्याचे बांधकाम निष्कृष्ट दर्जाचे होत असून त्यामध्ये गाळयुक्त रेती, गिट्टी तसेच हलक्या कंपनीच्या सिमेंट आणि कमी एम. एम. चा गज वापरून टाक्याचे बांधकाम निष्कृष्ट हे दर्जाचे सुरू आहे.
अशी तक्रार दिनांक 11 जुलै 2023 रोजी जिल्हा परिषद कार्यालय यवतमाळ येथे करण्यात आली होती.
पण सदर तक्रार अर्जाची कुठल्याही प्रकारची दखल न घेता व कुठल्याही प्रकारची कारवाईची चौकशी न केल्यामुळे म्हणून शाम धुळे यांनी आज उपअभियंता ग्रामीण पाणी पुरवठा कार्यालय उमरखेड येथे लेखी स्वरूपाचे पत्र देऊन दिनांक 31 जुलै रोजी आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.
तसेच माहिती अधिकारा सादर पाण्याच्या टाक्याचे इंस्टीमेंट मागितले होते पण ते सुद्धा देण्यात नाही.
या लेखी पत्रा मध्ये आमरण उपोषणात उपोषणकर्ते यांच्या जीवाला जीवित हानी झाल्यास संबंधित अधिकारी व संबंधित प्रशासन जबाबदार राहील असे लेखी स्वरूपाच्या पत्रामध्ये नमूद केले आहे.
असे शाम माधव धुळे (जिल्हा कार्याध्यक्ष भीम टायगर सेना) यांनी म्हटले आहे.
यावेळी उपोषणकर्ते शाम धुळे, कैलास कदम (तालुका अध्यक्ष भीम टायगर सेना,उमरखेड), संदीप विनकरे, सिद्धार्थ दिवेकर (शहराध्यक्ष भीम टायगर सेना उमरखेड) हे उपस्थित होते.













