Home महाराष्ट्र एकनिष्ठा फाउंडेशनला उत्तराखंड येथे राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

एकनिष्ठा फाउंडेशनला उत्तराखंड येथे राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

145

✒️खामगाव(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

खामगांव(दि.19जुलै):- गेल्या 2013 वर्षे पासून रक्तदान आणि गौ-सेवा व इतर अनेक सामाजिक कार्यात एकनिष्ठा गौ-सेवा रक्तसेवा फाउंडेशन ही समाजात कायम काम करीत आहे,समाजात वावरत असताना आपण समाजासाठी काहीतरी केले पाहिजे ही भावना लोकांच्या मनात जागृत करणे हे महत्वाचे काम आहे , आज पर्यंत एकनिष्ठा फाउंडेशनच्या वतीने हजारोच्या वर किती गरजू लोकांना नि:शुल्क निस्वार्थ आर्थिक सेवा कार्य भावनेने रक्ताची मदत अविरत करण्यात येत आहे.

या सेवा कार्याची दखल आपल्या भारत देशातील विविध राज्यातून घेतली जाते ,अशीच दखल उत्तराखंड या राज्यातून घेण्यात आली आहे ,अयोजित कार्यक्रम 28 ऑगस्ट 2023 रोजी उत्तराखंड या राज्यातील ऋषिकेश या शहरात होणाऱ्या राष्ट्रीय पुरस्कार साठी एकनिष्ठा गौ-सेवा रक्तसेवा फाउंडेशन महाराष्ट्र ला निमंत्रण पत्रिका मिळाली आहे ,हे आपल्या निःस्वार्थ सेवा कार्याची पावती आहेत सांगायचे म्हणजे जर तुम्ही तुमची सामाजिक जबाबदारी नि:स्वार्थ पने करत असाल तर त्याचे फळ एक ना एक दिवस तुम्हाला जरूर मिळते ,या सेवेत माझ्या प्रत्येक सहकारी मित्रांचे योगदान महत्त्वाचे आहे अशी प्रतिक्रिया सुरज यादव यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here