Home चंद्रपूर गोऱ्या ला वाचविण्यात गुराखी व गोरा ठार

गोऱ्या ला वाचविण्यात गुराखी व गोरा ठार

263

सहसंपादक//उपक्षम रामटेके 📱9890940507
येथून जवळच असलेल्या डोमा येथील एक गुराख्यास वाघाने हल्ला करून ठार केले आहे ही घटना शुक्रवारी घडलेली असून शनिवारी उघडकीस आलेली आहे यासोबतच गोऱ्याले ठार केलेले आहे
डोमा येथील डोमळू रामाजी सोनवाने 65 हा नेहमीप्रमाणे डोमा बिटातील कंपार्टमेंट नंबर 474 येथे जनावरे चारासाठी जात होता गावातील गुरहे घेऊन 14 जुलैला जंगलात गेला होता अचानकपणे वाघाने गोऱ्यावर हल्ला केला त्या गोऱ्याला वाचवण्यासाठी गुराखी केला असता त्याला ही वाघाने ठार केले संध्याकाळी जनावर घरी आले परंतु गुराखी घरी न आल्यामुळे घरच्या व गावातील लोकांनी जंगलात त्याची शोधाशोध केली परंतु रात्र होऊनही तो व्यक्ती दिसून आलेला नाही त्यामुळे आज सकाळीच शोधाशोध केली असता डोंमळू यांचा मृतदेह दिसून आला त्या मृतदेहापासूनच काही अंतरावर गोराही मारून दिसला असून त्याचा काही भाग खाल्लेल्या अवस्थेत होता याबाबतची माहिती वन विभागाला दिली असता वनपरिक्षेत्र अधिकारी देऊळकर वनपाल पोरते वनरक्षक विशाल सोनूले वन मजूर प्रदीप ढोणे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे शवविच्छेदन साठी उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे पाठवण्यात आले असून मृतकाच्या नातेवाईकांना तात्काळ 25 हजार रुपयांची मदत करण्यात आलेली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here