


पुणे: राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, शैक्षणिक क्षेत्रातील आव्हाने,कृत्रिम बुद्धिमत्तेचा शिक्षणावर होणारा परिणाम या विषयावर प्रामुख्याने भर देत.
स्पायसर ॲडव्हेंटिस्ट विद्यापीठ आणि स्पायसर उच्च माध्यमिक विद्यालय आणि ह्यूम मॅकहेन्री मेमोरियल हायस्कूल तसेच सेव्हन्थ-डे ॲडव्हेंटिस्ट चर्चच्या दक्षिण आशिया शिक्षण विभागाच्या वतीने रविवार ९ जुलै रोजी पुण्यातील स्पायसर ॲडव्हेंटिस्ट विद्यापीठात,शिक्षक पालक भागीदारीतील विस्तारित शिक्षणावरील राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर एस.यु.डी चे शिक्षण संचालक डॉ. एडिसन सामराज, आयसीएससी कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. जी. इमॅन्युएल,लिव्हिंग थॉटचे संचालक डॉ संतोष मिश्रा,स्पायसर ॲडव्हेंटिस्ट विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजीवन आरसूड,यादी मान्यवर उपस्थित होते
विद्यार्थ्यांमधील सुप्त गुण हेरून त्यांना वैज्ञानिकदृष्ट्या सक्षम करणे तसेच पुरेशा संधी उपलब्ध करून देणे हेच या धोरणाचे मूलभूत उद्दिष्ट आहे.
मानवाचा सर्वागीण विकास हाच आपल्या शिक्षण व्यवस्थेचा आधार बनला पाहिजे या विचाराला अधिक बळ देत विद्यार्थ्यांना विविध मूल्ये आत्मसात करणे तसेच विज्ञान, संशोधन तसेच इतर कौशल्ये शिकण्यास मदत करणे.कल्पकता आणि सर्जनशीलतेतून नव्या शैक्षणिक धोरणानुसार वाटचाल करणे,हे देशासाठी महत्त्वाचे ठरेल अशा विविध शैक्षणिक पैलू आणि शैक्षणिक घडामोडींवर मान्यवरांनी भाष्य केले.
मुलांसाठी पारंपारिक खेळ आणि हेल्थ एक्स्पो सादर करणाऱ्या ट्रेडीझोनचे उद्घाटनही डॉ.एज्रास लक्रा यांच्या हस्ते करण्यात आले.
या परिषदेत मोठ्या संख्येने शिक्षक, प्राध्यापक,पालक तसेच विद्यार्थी उपस्थित होते.













