Home चंद्रपूर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन

138

 

चिमुर/प्रतिनिधी :-

वंचित बहुजन आघाडी जिल्हा चंद्रपूर (पूर्व व पश्चिम) व महानगर चंद्रपूरच्या संयुक्त विद्यमाने दलित, मुस्लिम, ओबीसी, भटके, आदिवासी, अल्पसंख्यांकावरील पोलीस व धर्मांध शक्तीकडुन होणा-या अत्याच्याराच्या विरोधात दिनांक १३ जुलै रोजी दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे मोर्चा काढण्यात येणार आहे.

या मोर्चात जरीन खानचा पोलीस कोठडीत खुन करणा-या पोलीस कर्मचा-यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून आरोपीला तात्काळ अटक करून निलंबीत करावे, जरीन खानच्या कुटुंबीयांना ५० लाखाची शासकीय आर्थिक मदत मिळावी, अहमदनगर जिल्हा अकोले येथील अशरफ अतिक शेख याचाही धर्मांध लोकांनी अमानुषपणे खुन करणा-या दोषींचा शोध घेण्यात यावा, जळगाव, अमळनेर येथील अश्पाक सलीम शेख याची पोलीस कस्टडीत हत्या करणा-या पोलीसांना तात्काळ निलंबीत करावे, नांदेड जिल्हयातील बोंढार गावच्या अक्षय भालेरावच्या मारेक-याना फाशीची शिक्षा द्यावी, बीड जिल्हयातील परळी तालुक्यातील कदम कुटुंबावर जिवघेणा हल्ला करणा-या आरोपीवर कारवाई करावी, रेणापूर येथील मातंग बांधवाचा खुन करणा-या आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी आदी मागण्याचा समावेश आहे.

या मोर्चाचे नेतृत्व पूर्व विदर्भ समन्वयक डॉ. रमेशकुमार गजबे, राज्य कार्यकारीणी सदस्य कुशल मेश्राम, पूर्व विदर्भ समन्वयक अरविंद सांदेकर, जिल्हा प्रभारी राजेश बोरकर, जिल्हाध्यक्ष पुराणिक गोंगले, सोमाजी गोंडाणे, जिल्हा कार्याध्यक्ष जयदीप खोब्रागडे, महिला जिल्हा अध्यक्ष कविता गौरकार, चंद्रपूर महानगराध्यक्ष बंडु ठेंगरे, महिला आघाडी महानगराध्यक्ष तनुजा रायपुरे, महानगर कार्याध्यक्ष सतीश खोब्रागडे, युवक आघाडी जिल्हाध्यक्ष शुभम मंडपे, निखील रतेवार, सम्यक विद्यार्थी आंदोलनचे जिल्हाध्यक्ष धिरज तेलंग आदी मान्यवर करणार आहेत.

मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा सल्लागार नारायण कांबळे, ज्ञानेश्वर नागदेवते, जिल्हा उपाध्यक्ष विनोद देठे, स्नेहदिप खोब्रागडे, चिमूर तालुका अध्यक्ष बाळासाहेब बन्सोड, कोषाध्यक्ष जनार्धन खोब्रागडे, चिमुर शहर अध्यक्ष शालीक थुल, उपाध्यक्ष मनोज राऊत आदीने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here