Home चंद्रपूर साहेब, कोतवाल ची जागा विकली… आता सांगा, पोलीस पाटलाची जागा किती मध्ये...

साहेब, कोतवाल ची जागा विकली… आता सांगा, पोलीस पाटलाची जागा किती मध्ये देणार?

347

रोशन मदनकर (उप संपादक) मो. 88886 28986
ब्रम्हपुरी(दि.17 जून):-
ब्रह्मपुरी तालुक्यातील कोतवाल भरती परीक्षेमध्ये भ्रष्टाचार झाल्याची बाब सर्वत्र हवेच्या वेगात पसरलेली आहे.
ब्रह्मपुरी तालुक्यातील अनेक गावांकरीता कोतवाल भरती चा पेपर 15 जून 2023 ला घेण्यात आला. ज्या लोकांची पैशांची सेटिंग संबंधित अधिकाऱ्यांसोबत झाली त्या विद्यार्थ्यांना पेपर एकही सोडवायचा नाही असा आदेश देण्यात आला त्याच आधारे त्या विद्यार्थ्यांनी पेपर सोडविला नाही आणि त्यांचा पेपर संबंधित अधिकाऱ्यांनी सोडवून त्यांना सर्वाधिक गुण प्राप्त केले आणि त्याची निवड झाली अशी पेपर देणाऱ्या विद्यार्थ्यांकडून माहिती प्राप्त झाली. त्यामुळे
पेपर दिलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या न्यायासाठी उपविभागीय अधिकारी व तहसीलदार , महसूल विभाग यांना निवेदन देवून योग्य ती कारवाहीची मागणी केली. परंतु ब्रह्मपुरी तालुक्यातील पोलीस पाटील पदभरतीचा पेपर बाकी असल्याने सर्व तालुक्यातील नागरिकांमध्ये जोराची एकच चर्चा रंगली आहे, साहेब कोतवालाची जागा विकली आता सांगा पोलीस पाटलाची जागा किती मध्ये देणार ? कोतवाल किंवा पोलीस पाटील पदभरती मध्ये भ्रष्टाचार होत असेल तर गावाचा विकास कसा होणार ? भ्रष्टाचारी आपला सेटिंगचा पैसा काढण्यासाठी पूर्ण गावच भ्रष्ट करणार. त्यामुळे नागरिकांचा अधिकाऱ्यांवरचा असलेला विश्वास टिकविण्यासाठी पेपर सेटींग करणाऱ्या व्यक्तीवर योग्य ती कारवाही करून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा असा चर्चेचा विषय ब्रम्हपुरी तालुक्यात ऐकायला मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here