


बातमी पुसद
दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा यवतमाळ अंतर्गत तालुका शाखा पुसद यांच्या वतीने दि. ३ ते १२ मे पर्यंत बुद्ध पौर्णिमेचे औचित्यसाधुन दहा दिवशीय बौद्धांचार्य श्रामणेर शिबिर पारमिता बुद्धविहार महावीरनगर येथे आयोजन करण्यात आले होते त्याचा समारोपीय कार्यक्रम दि.१२मे रोजी करण्यात आला
या शिबिराचे अध्यक्ष म्हणून
भारतीय बौद्ध महासभेचे
तालुकाध्यक्ष, भारत कांबळे, प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाध्यक्ष रवि भगत,संघनायक पुज्य भंते सारिपुत्त सोलापूर,मार्गदर्शक म्हणून केंद्रीय शिक्षक
सुमंगल तथा रवींद्र अहिरे गुरुजी जळगाव,तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा सरचिटणीस रुपेश वानखडे, उमरखेड तालुकाध्यक्ष धम्मदिप काळबांडे, महागाव तालुकाध्यक्ष प्रकाश खंदारे, दिग्रस तालुकाध्यक्ष विनायक देवतळे, आर्णी तालुकाध्यक्ष नागोराव बन्सोड, केंद्रीय शिक्षक धम्मदीप पाईकराव तसेच इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुज्य भंते सारीपुत्त सोलापूर आणि रविंद्र तथा सुमंगल अहीरे गुरूजी केंद्रीय शिक्षक जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली मनोज सुनिल गुप्ता आणि निता मनोज गुप्ता यांना बौध्दाचार्य किशोर आळणे यांनी २२प्रतिज्ञा व भंते सारीपुत्त यांनी त्रिसरण पंचशील देऊन बौद्ध धम्माची दिक्षा देण्यात आली.धम्मदिक्षा नंतर त्यांचे नाव मनोज सुनिल बौद्ध आणि निता मनोज बौद्ध असे ठेवण्यात आले.
नवदीक्षितांना धम्मदीक्षा प्रमाणपत्र देण्यात आले.
या दहा दिवशीय बौध्दाचार्य श्रामणेर शिबिरात एकूण २७ शिबिरार्थीनी यांनी सहभाग घेतला होता. सर्वांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले
अनेक शिबीरार्थी यांनी आपले मनोगत यक्त केले.
यावेळी रवि भगत,रुपेश वानखेडे, सुमंगल तथा रवींद्र अहिरे गुरुजी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रल्हाद खडसे यांनी केले. तर सूत्रसंचालन भोलेनाथ कांबळे यांनी आहे. तर आभार भगवान बरडे यांनी मानले.
यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी, समता सैनिक दलाचे पदाधिकारी तसेच उपासक- उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.सरणतय गाथेने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.













