Home चंद्रपूर रस्त्यावरील वंचितांच्या प्रश्नावरील राष्ट्रीय परिषदेत शुभम पसारकर यांच्या दिव्यवंदना संस्थेच्या कार्याचा गौरव

रस्त्यावरील वंचितांच्या प्रश्नावरील राष्ट्रीय परिषदेत शुभम पसारकर यांच्या दिव्यवंदना संस्थेच्या कार्याचा गौरव

162

चिमूर-दि.१३ मेः- जीवन आनंद संस्था आणि सारस्वत एज्युकेशन सोसायटीचे सारस्वत काँलेज आँफ काँमर्स अँण्ड मँनेजमेंट स्टडिज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजण्यात आलेल्या म्हापसा (गोवा) येथील राष्ट्रीय परिषदेत चिमूर तालुक्यातील दिव्यवंदना आधार फौडेशन संस्थेचे अध्यक्ष शुभम पसारकर यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. परिषदेच्या समारोपीय समारंभात प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थीत असलेल्या म्हापसा नगर परिषदेच्या नगराध्यक्षा प्रिया मिसाळ यांच्या हस्ते व जीवन आनंद संस्थेचे संस्थापक संदिप परब व सारस्वत काँलेजचे प्राचार्य डाँ.संतोष पाटकर,जीवन आनंद संस्थेचे अध्यक्ष नरेश चव्हाण, सल्लागार श्रीनिवास सावंत, विश्वस्त पुनम बुर्ये, किसन चौरे, जितेंदूर परब यांचे प्रमुख उपस्थीत सन्मानचिन्ह व सन्मानपत्र प्रदान करून शुभम यांना गौरविण्यात आले. रस्त्यावरील निराधार वंचिताच्या प्रश्नावर कार्य करणा-या देशमरातील १६ संस्थाचे ४५ प्रतिनिधी या दोन दिवशीय राष्ट्रीय परिषदेत सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here