


पंकज रामटेके, विशेष प्रतिनिधी
घुग्घुस- ३६ वा स्वच्छता अभियान दि. ८मे २०२३ दर सोमवार रोजी जेष्ठ नागरिक संघ व श्री.सत्यशिव गुरुदेव सेवा मंडळ तर्फे दर सोमवार सार्वजनिक, धार्मिक स्थळ, ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत “स्वच्छता श्रमदान यज्ञ “राबविण्यात येत आहे.
तसेच दि.८मे २०२३ सोमवार रोजी घुग्घुस येथील काही अंतरावर म्हातारदेवी येथील महाकाली नगरीत गणेश मंदिर, हनुमान मंदिर परिसरातील स्वच्छता, साफसफाई अभियान राबविण्यात आली आहे.
स्वच्छता नागरिकांने श्रमदान यज्ञ पूर्ण करा हर गावा, गावात व घरातील व परिसरातील वातावरण स्वच्छ ठेवा. असे मनोगत व्यक्त जेष्ठ नागरिक संघ व श्री.सत्यशिव गुरुदेव सेवा मंडळातर्फे सुरुच आहे.
यावेळी श्री.सत्यशिव गुरुदेव सेवा मंडळ अध्यक्ष श्री.मधुकर मालेकर, महाकाली नगरी गणेश व हनुमान मंदिर अध्यक्ष पुरुषोत्तम वडस्कर, सचिव संदीप चांबारे, उपाध्यक्ष अमोल खिरटकर, गुरुदेव मंडळाचे नंदुभाऊ ठेंगणे, मारोती पिंपळकर, नीलकंठ नांदे, प्रमोद उपाध्ये,योगिराज गोखरे, विठ्ठल शिखरे, म्हातारदेवी, महाकाली नगरी जेष्ठ व इतर नागरिक उपस्थित होते.












