Home महाराष्ट्र पुसेगावच्या नावात एक मानाचा तुरा-केंद्राच्या यादीत सर्वोत्कृष्ट पोलीस स्टेशन म्हणून पुसेगाव राज्यात...

पुसेगावच्या नावात एक मानाचा तुरा-केंद्राच्या यादीत सर्वोत्कृष्ट पोलीस स्टेशन म्हणून पुसेगाव राज्यात प्रथम तर देशात पहिल्या दहा मध्ये!

249

खटाव/नितीन राजे, विशेष प्रतिनिधी
पुसेगाव तालुका खटाव जिल्हा सातारा येथील पोलीस स्टेशनचा केंद्राच्या पाहणीनुसार सर्वोत्कृष्ट पोलीस स्टेशन म्हणून राज्यात प्रथम तर देशात दहा पोलीस स्टेशन मध्ये क्रमांक आलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह सातारा जिल्ह्याच्या व पुसेगाव नगरीच्या नावात आणखीन एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
केंद्राच्या पाहणीनुसार
dgsp /igsp परिषद यांच्याद्वारे घेण्यात आलेल्या सर्वोत्कृष्ट पोलीस स्टेशन चा मान पुसेगाव ला देण्यात आला.
पोलीस ठाण्याचा क्राईम डेट गुन्ह्यांची तपासणी ऑनलाईन कामाची पद्धत वेळेत कामकाज पूर्ण करणे लोक भिमुख कार्य चारित्र्याचे दाखले अशाअनेक अटी व शर्ती पास करत हा बहुमान मिळवला. यासाठी स्पर्धा सुरू होणार त्यापासून ची सर्व अधिकारी कर्मचारी पुसेगाव,खटाव,सह खटाव तालुक्याच्या उत्तर भागातील सर्व जनता लोकप्रतिनिधी,विविध मंडळांचे अध्यक्ष, पदाधिकारी ,कार्यकर्ते अत्यंत कर्तव्यदक्ष व प्रामाणिकपणे केलेल्या कामाचा हा गौरव असल्याची पोचपावती म्हणून सातारा sp समीर शेख,add.sp बापुसाहेब बांगर, तत्कालीन लिन सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, संभाजी गायकवाड ,चेतन मछले पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब लोंढे पाटील यांनी परिश्रम घेतले. हा तर महाराष्ट्रासह पुसेगाव चा अभिमान असल्याची अशी लोकभावना सर्व स्तरातून व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here