Home चंद्रपूर व्हाईस ऑफ मिडीया साप्ताहिक विभागाचे जिल्हा कोषाध्यक्ष पदावर नरेश निकरे यांची निवड-Naresh...

व्हाईस ऑफ मिडीया साप्ताहिक विभागाचे जिल्हा कोषाध्यक्ष पदावर नरेश निकरे यांची निवड-Naresh Nikre elected as District Treasurer of Voice of Media

143
  • चंद्रपूर / प्रतिनिधी-

पत्रकारांची देशपातळीवर काम करणारी संघटना व्हाईस ऑफ मिडीया साप्ताहिक विभागाचे चंद्रपूर जिल्हा कोषाध्यक्ष पदावर साप्ताहिक प्रेझ टु महाराष्ट्रचे संपादक नरेश निकरे यांची निवड करण्यात आली आहे.

नरेश निकुरे यांची निवड व्हाईस ऑफ मिडीयाचे संस्थापक अध्यक्ष संदिप काळे-Sandeep Kale, founder president of Voice of Media, राष्ट्रीय महासचिव दिव्या भोसले, प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के, व्हाईस ऑफ मिडीया साप्ताहिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष विनोद बोरे, विभागीय अध्यक्ष मंगेश खाटीक, जिल्हाध्यक्ष संजय पडोळे यांच्या अनुमतीने साप्ताहिक विभागाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष जितेंद्र जोगड यांनी केली आहे.

नरेश निकुरे हे गेल्या अनेक वर्षापासून विविध साप्ताहिक, दैनिक वृत्तपत्रात संगणक चालक म्हणून कार्यरत आहेत. सन २०१३ पासुन साप्ताहिक पुरोगामी संदेश-Purogami Sandesh मध्ये कार्यकारी संपादक या पदावर काम करीत असतानाच त्यांनी गेल्या दिड वर्षापूर्वी स्वतःच्या मालकीचे साप्ताहिक प्रेझ टु महाराष्ट्र हे वृत्तपत्र सुरु केले आहे. व्हाईस ऑफ मिडीया साप्ताहिक विभागाचे चंद्रपूर जिल्हा कोषाध्यक्ष पदावर निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

व्हाईस ऑफ मिडीया साप्ताहिक विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र जोगड (संपादक लोकतंत्र को आवाज) यांनी घोषीत केलेल्या व्हाईस ऑफ मिडीयाच्या जिल्हा कार्यकारणीत जिल्हा कार्याध्यक्ष पदावर सुरेश डांगे (साप्ताहिक पुरोगामी संदेश) व अरुण वासलवार (संपादक स्वराज्याचा अरुणोदय), जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र बोकारे (संपादक सर्व देशबांधव) व प्रा. शामराव करंबे (संपादक ब्रम्हनगरी), जिल्हा सरचिटणीस विनोद बोदले (कार्यकारी संपादक पॉवरसिटी) व विठ्ठल आवळे (संपादक चंद्रपूर सप्तरंग), जिल्हा कोषाध्यक्ष नरेश निकुरे (संपादक प्रेझ टु महाराष्ट्र), जिल्हा कार्यवाहक गणेश रहिकवार (संपादक चंडीका एक्सप्रेस), जिल्हा संघटक मनोहर दोतपल्ली (संपादक राज्य रिपोटर), जिल्हा सहसंघटक आशिष घुमे (संपादक सहयाद्रीचा राखणदार) तर जिल्हा कार्यकारणी सदस्यांमध्ये अशोक कोसे (संपादक नागभीड सेवक), राम चिचपाले (संपादक लोक प्रतिष्ठा), सुयोग डांगे (संपादक पुरोगामी एकता) यांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here