


पुसद प्रतिनिधी
स्वप्निल गोरे
फुलसिंग नाईक महाविद्यालय पुसद येथील रसायनशास्त्र विभाग प्रमुख तथा पावणे तीन वर्ष कार्यकारी प्राचार्य म्हणून कार्यरत असलेले प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर प्राध्यापक डॉ. अरुण पाटील सर प्रदीर्घ सेवेनंतर दिनांक 30 एप्रिल 2023 रोजी सेवानिवृत्त झाले त्यांचा सेवापुर्ती सोहळा फुलसिंग नाईक परिवाराच्यावतीने संपन्न झाला. याप्रसंगी त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. विविध विभागाच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला करण्यात आला जनता शिक्षण प्रसारक मंडळ पुसद व फुलसिंग नाईक महाविद्यालय यांच्या वतीने त्यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला. तसेच प्राध्यापक सभेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राध्यापक वृंदा तर्फे तसेच कर्मचारी वृंदांतर्फे त्यांना भावपूर्ण सत्कार करून सन्मान करण्यात आला विविध प्राधिकरणांद्वारे सहकारी पतसंस्था, एल डब्ल्यू एफ प्राधिकरणांद्वारे अशाही प्राधिकरणांद्वारे त्यांना सन्मानित करण्यात आले व त्यांच्या सेवानिवृत्तीनंतरच्या शुभेच्छा देण्यात आल्या सोबतच त्यांच्यासह त्यांचा चिरंजीव डाक्टर अजिंक्य, त्यांचे स्नेही प्रा.टिकार, व वैभव टिकार तसेच त्यांच्या पत्नी यांचाही सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी महाविद्यालयातील ज्येष्ठ प्राध्यापक दत्ता कदम सर हे अध्यक्षस्थानी होते तसेच प्रमुख अतिथी म्हणून कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य संजय पद्मावार व प्रभारी प्रबंधक श्री उमेश भाऊ चव्हाण तसेच भौतिकशास्त्र विभागाचे प्राध्यापक प्रवीण हमजादे हे उपस्थित होते याप्रसंगी अनेक प्राध्यापक वृंदांनी तसेच कर्मचारी वृंदांनी आपल्या भावना मनोगतातून व्यक्त केल्या देविदास चव्हाण, प्रा. वैभव पाटील, प्रा. पंकज कहाते, प्रा. संजय भोयर, प्राध्यापक टिकार सर, प्राध्यापक यू एम चव्हाण सर, प्रा. डॉक्टर भास्कर पाढेण, यांनीही आपले मनोगत व्यक्त करून प्राध्यापक पाटील सरांना शुभेच्छा दिल्या प्राध्यापक अंजली पाटील यांनी सुद्धा आपले मनोगत याप्रसंगी व्यक्त केले व डॉक्टर अरुण पाटील सरांचे कार्यकर्तृत्व यावर प्रकाश टाकला.
या कौटुंबिक सोहळ्याचे सूत्रसंचालन प्राध्यापक प्रल्हाद वावरे यांनी केले आपल्या अध्यक्षीय भाषणात कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक दत्ता कदम सरांनी महाविद्यालयाच्या एकूणच परिस्थितीचा आढावा घेतला तसेच पाटील सरांना शुभेच्छा दिल्या सत्कारमूर्ती प्राध्यापक पाटील यांनी जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माननीय जयभाऊ नाईक तसेच सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आणि महाविद्यालयाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सर्व प्राध्यापक वृंद व कर्मचारी वृंदांनी कार्य करावे अशा प्रकारचे मनोगत व्यक्त केले 36 वर्ष आठ महिने प्रदीर्घ सेवा देऊन महाविद्यालयाला सन्मान प्राप्त करून देण्यात माझा फार मोठा वाटा आहे किंवा नाहीं हे मला सांगता येत नाही मात्र विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी झटलो याचे समाधान आहे, फुलसिंग नाईक महाविद्यालयाची अशीच उत्तरोत्तर प्रगती व्हावी अशा प्रकारची भावना आपल्या मनोगतात पाटील सरांनी व्यक्त केली आणि सर्वांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कर्मचारी वृंद उपस्थित होते कनिष्ठ महाविद्यालयाचे सुद्धा सर्व प्राध्यापक उपस्थित होते या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीत ने झाली.













