Home चंद्रपूर लाइट्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड उद्योगात महाराष्ट्र, आंतरराष्ट्रीय कामगार दिन समारंभ

लाइट्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड उद्योगात महाराष्ट्र, आंतरराष्ट्रीय कामगार दिन समारंभ

147

 

पंकज रामटेके, विशेष प्रतिनिधी
घुग्घुस – येथील लाॅईड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड उद्योगात दर महिन्या प्रमाणे दि.१ मे 2023 च्या महिन्यासाठी मासिक सुरक्षा बैठक घेतली,व सहायक सुरक्षा अधिकारी अक्षय तेठे यांनी सर्व कर्मचार्यांना एकजूट बोलवुन हात जोडून सुरक्षा रक्षकाची प्रतिज्ञा करण्यात आले.

२०२३ एप्रिल महिण्याचा शेफ्टी हिरो इलेक्ट्रॉनिक विभाग ५०० टि.पी.डी चे प्रेमकुमार राठोड व १०० टि.पी.डी विभाग चे कर्मचारी किशोर तुसे यांना युनिट हेड श्री.संजयकुमार यांच्या हस्ते बक्षिस व प्रमाणपत्र देण्यात आले.

कंपनीचे युनिट हेड श्री.संजयकुमार यांनी सर्व कर्मचार्यांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्या दिल्या.
संजय कुमार म्हणाले की,१ मे हा महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो  “जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा” असा प्रत्येकाच्या ओठावर हे गाणे तरळलेल जाते अशा या महान महाराष्ट्र  राज्याची स्थापना कशी झाली, हे आपणास माहीत असणे गरजेचे आहे महाराष्ट्र म्हणजेच महान असे राष्ट्र असे म्हटले जाते आणि खरोखरच हे राष्ट्र म्हणजे एक महान असे राष्ट्र,महाराष्ट्र ही संतांची ,शूरांची, पराक्रमाची, त्यागाची, बलिदानाची भूमी आहे  शूरवीर महायोद्धे त्यांची भूमी आहे . महान महाराष्ट्राचा इतिहास माहित असणे गरजेचे आहे म्हणून १ मे महाराष्ट्र दिन साजरा कसा करतात का करतात हे पाहणे महत्त्वाचे आहे,
मे हा दिवस राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दृष्टीने महत्वाचा आहे. पहिलं कारण आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. याच दिवशी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली होती. दुसरं कारण आहे या दिवसाला आंतरराष्ट्रीय कामगार दिन आणि मे दिन म्हणून जगभर मान्यता मिळाली आहे.
तसेच सुरक्षा अधिकारी विपीन राइकवार, एच.आर.चे रमेश राधेराम यांनी श्री.संजयकुमार यांच्या मार्गदर्शनाबद्दल मनापासून आभार व्यक्त करण्यात आले.
यावेळी सर्व स्टाफ,स्थायी,अस्थायी कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here