


✒️ सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ) मो.9823995466
उमरखेड\ ढाणकी (दि. 1 मे) महाराष्ट्र राज्यात गुटखा बंदीचा कायदा असूनही आणि यवतमाळ जिल्याचे पोलीस अधिक्षक यांचे सर्व अवैध व्यवसाय बंद करून कडक कारवाई चे स्पष्ट आदेश असतांनाही मात्र ढाणकी शहरात
व येथूनच संपूर्ण तालुक्यात मोठ्या प्रमाणात मोठ-मोठी दुकाने थाटून “उपरसे टापटीप, अंदरसे ‘दाम’ जाने” अश्या पध्दतीने हा व्यवसाय पोलीसांच्या डोळ्यादेखत राजरोसपणे सुरु असूनही स्थानिक पोलीस प्रशासन व अमली पदार्थ
विरोधी पथक आणि अन्न व औषध प्रशासनातर्फे कुठल्याही प्रकारची कारवाई का होत नाही? यामागे मोठं अर्थकारण असल्याचे समजतं.
व्यापारी संकुल मधील एका दुकानात मोठया प्रमाणावर अवैध गुटखा विक्री होत असल्याची चर्चा आहे.
आज हा अवैध गुटखा विक्रीचा व्यापार मोठ्या प्रमाणात शहरातील काही ठिकाणा वरून होत असून अल्पावधीतच हा व्यवसाय करणाऱ्यांनी गरीबांची घरे नियमबाहय विकत घेऊन रहिवास आणि हा अवैध गुटखा, सुंगधित तंबाखु ठेवण्याकरीता दुमजली मोठ-मोठ्या इमारती उभ्या केलेल्या
आहे.
हा व्यवसाय संबंधित विभागांच्या मार्फत सुरळीत सुरू रहावा याकरीता या व्यवसायातील ‘मास्टर माईंड’ यांच्या मार्फत संबंधितांना दरमहा लाखो रुपयांची ‘खिरापत’ पोहचत असल्यानं आमचे कुणीही काही वाकड करु शकत नाही या अविर्भावात हे अवैध गुटखा विक्री करणारे व्यवसायिक वावरत आहे.
शहरात सुरू असलेला हा अवैध व्यवसाय त्वरीत बंद करावा अशी मागणी जोर धरत आहे.
या गुटख्यापायी शरीर निकामी होत असलल्याची भीती युवा पिढीच्या पालकांना वाटत आहे.
तरी या संबंधाने आता जिल्हा
पोलीस अधिक्षकांनी योग्य ती
पाऊले उचलावी व आरोग्यासाठी अती घातक अवैध व्यवसाय कायमस्वरुपी बंद करावा अशी मागणी होत आहे.













