


नागभीडः नागभीड तालुक्यातील कोटगांव येथील कृषक विद्यालयातील चार विद्यार्थी यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत बाजी मारली आहे. शासनाकडुन घेण्यात आलेल्या NMMS या परीक्षेत कृषक विद्यालयातील विद्यार्थी परीक्षेला ऊत्तीर्ण झाले आहेत. यात आरती योगराज पिसे, साहील रविंद्र थोटे,रुषिकेस दिलीप मेंढे, साहील देवानंद बिलोने हे विद्यार्थी ऊत्तीर्ण झाले आहेत. यांना दरमहा एकहजार रुपये शिष्यवृत्ती प्रमाणे पांच वर्ष मिळणार आहे. या यशाचे श्रेय त्यांनी शाळेच्या मुख्याधापीका मरगडे , शाळेतील शिक्षक वृंद तसेच आई बाबा यांना दिले आहे. या यशा बद्दल कोटगांव , कोथुळना ,तेलीमेंढा येथील नागरीकांनी अभिनंदन व कौतुक केले आहे.












