Home चंद्रपूर आजारी शेळ्या देऊन लाभार्त्यांची फसवणूक/कोरंबी ग्रामसभा ऍकशन मोडवर कोरंबि येथे पशुवैद्यकीय टिम...

आजारी शेळ्या देऊन लाभार्त्यांची फसवणूक/कोरंबी ग्रामसभा ऍकशन मोडवर कोरंबि येथे पशुवैद्यकीय टिम च्या वतीने बिमार पाळीव प्राण्यांचे लसीकरण संपन्न.

151

नागभिड :नागभीड तालुक्यातील कोरंबी तसेच सभोवताल गावातील शेळ्या दुर्गम आजार झालेला आहे. हा सर्व आजार पशुपालन विभागातर्फे दिल्या जाणाऱ्या बिमार शेळ्या मुळे झाल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत.
कोरंबी या अतिदुर्गम आदिवासी गावात शासकीय योजनेतून दिलेल्या शेळ्यांना रोगराई आल्याने शेळ्या मरण पावल्या व त्या आजारी शेळ्यांची लागण झाल्याने गावातील काही शेळ्या मरण पावल्या तर बऱ्याच शेळ्या आजारी झाल्यात ही गंभीर समस्येचे निराकरण करण्यासाठी ग्रामसभा कोरबी च्या पदाधिकारी यांनी पशुवैद्यकीय अधिकारी यांना वेठीस धरले व गावात येऊन तत्काळ उपचार करायला भाग पाडले. देवरुप जांभुळे यानी काही दिवसाअगोदर पशु विभागातर्फे 10 शेळ्या आणि 1 बोकड यांची उचल केली पण काही दिवसात त्या शेळ्याना आजार आला. देवचंद जांभुळे यानी 10 ते 15 हजार रुपयांची औषधउपचार केला पण काहीच फायदा झाला नाही, पशु विभागाकडे चकरा मारू लागला. पण कुणीच दाद देत नव्हता. अखेर त्यांनी रिवार्ड संस्थेला भेट देऊन तेथील संस्थापक गुणवन्त वैद्य यांना सर्व हकीकत सांगितली. गुणवन्त वैद्य यानी थोडाही विलंब न लावता डाँ मंगेश काळे यांना तात्काळ फोन लावून उपाययोजना करण्यास सांगितले व काही अडचण आल्यास कोरंबी गावातील ग्रामसभाचे पदाधिकारी मदत करतील असे सांगितले.
दिनांक २९ फेब्रुवारी ला पशुवैद्यकीय विभागाची संपूर्ण टीमने दिवसभर शेळ्यांचा उपचार केला व चांगली सेवा दिली. त्यामुळे शेळीपालन करणारे तसेच गावकऱ्यांचे तूर्त समाधान झाले. मात्र यापुढे पशुवैद्यकीय अधिकारी यांनी विशेष लक्ष देऊन सतत सेवा द्यावी अशी स्थानिक लोकांची मागणी आहे.
या प्रकरणावरून संबंधित अधिकारी च्या गैर जबाबदारीच्या वर्तणुकीचे व्यवहार दिसून आले.पशुपालन विभागामार्फत 10 शेळी व एक बोकड ची योजना ही लाभार्थीसाठी फसवणूक करणारी ठरली आहे. या योजनेतून निरोगी शेळ्या देणे बंधकारक आहे मात्र तसे न होता आजारी शेळ्या देऊन लाभार्थ्यांची सर्रास फसवणूक केली जात असल्याची शंका यानिमित्ताने उपस्थित होते आहे. याप्रकरणी वरिष्ठ स्तरावरून चौकशी होणे आवश्यक आहे. कोरबी येथील लाभार्थी श्री.देवचंद जांभुळे यांना तत्काळ मृत शेळ्यांची नुकसान भरपाई द्यावी अशी स्थानिक लोकांची मागणी आहे.या शिबिर यशवी होण्यासाठी रिवार्ड संस्थेने विशेष सहकार्य केले. तसेच रिवार्ड संस्थेचे संस्थापक गुणवन्त वैद्य, कैलास नन्नावरे, भोजराज नवघडे यानी विशेष सहकार्य केले.डाँ सौं जगजाते मॅडम, डाँ ममता वानखेडे, डाँ देवानंद बागडे, डाँ राऊत, डाँ भल्लावी तसेच गजानन कुंभरे, महादेव नन्नावरे, भोजराज इरपाते, पोलीस पाटील, केशव जांभुळे ग्रामसभा अध्यक्ष कोरंबी, कैलास नन्नावरे, रिद्धीशवर मडावी, केशव खंडाते यानी या मोहिमेत विशेष सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here