Home चंद्रपूर मातंगांनी आता हलकी समाजाची अस्मिता जागृत करण्यासाठी वाजवली पाहिजे – सौ.लता डकरे

मातंगांनी आता हलकी समाजाची अस्मिता जागृत करण्यासाठी वाजवली पाहिजे – सौ.लता डकरे

158

सय्यद शब्बीर जागीरदार,विशेष प्रतिनिधी

जिवती:मुक्ता फाउंडेशन आणि लहुजी साळवे कर्मचारी संघटना जिवती यांचे संयुक्त विद्यमाने
स्त्री शिक्षण क्रांतीचे जनक महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा कार्यक्रम घेण्यात आला. त्यात महात्मा फुले यांचा देशाच्या महिलांचा विकास करण्यात किती मोठा वाटा आहे यावर चर्चा केली. महिलांना देशात महात्मा फुले आणि बाबासाहेबांनी मालक बनविले. बाहेर देशात महिलांना मतदान चा हक्क मिळावा म्हणून मोर्चा करावा लागला पण भारतात बाबासाहेबांनी हा अधिकार दिला. त्याच महिलांना महात्मा फुले यांनी शिक्षित केले.म्हणून या दोन महापुरुषांचे काम हे केवळ एका जाती धर्मासाठी नसून सबंध भारतासाठी आहे. हे यावेळी विचार मांडण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ.लता डकरे यांनी सांगितले की बाबासाहेब यांचे मुळेच मला आज अध्यक्षस्थान भूषवण्याचा मान मिळाला.यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ.प्रशांत सूर्यवंशी यांनी भूषविले.प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा.डॉ.दिलीप चौधरी, विचारवंत चंद्रपूर,बालाजी थोटवे, युवा व्याख्याते राहुल गायकांबळे, भानुदास जाधव,राघोजी ब्रिगेड अध्यक्ष शाहीर अंकुश मोरे, अंकुश काकडे,डॉ.भूषण मोरे, सामाजिक कार्यकर्ते गणेश मेकाले, तेलंगणा सामाजिक कार्यकर्ते राजकुमार गोपले, लोकस्वराज्य आंदोलन विदर्भ प्रमुख दत्तराज गायकवाड,,यावेळी प्रास्ताविक लोकस्वरज्य आंदोलन विदर्भ प्रमुख दत्तराज गायकवाड आणि सूत्र संचालन समतादुत बालाजी मोरे तर आभार राजाराम घोडके अध्यक्ष लहुजी साळवे कर्मचारी संघटना,जिवती यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here