Home चंद्रपूर कोणाच्या आशीर्वादाने गडचांदुर ट्राफीक पोलीसांची अवैध वसुली? आठवडी बाजारात जनावरे घेऊन येणाऱ्या...

कोणाच्या आशीर्वादाने गडचांदुर ट्राफीक पोलीसांची अवैध वसुली? आठवडी बाजारात जनावरे घेऊन येणाऱ्या शेतक-यांची लूट थांबवा – संतोष पटकोटवार

238

( सय्यद शब्बीर जागीरदार )
गडचांदुर येथे बैल बाजार भरतो त्यामुळे खेड्यापाड्यातून वा ईतर शहरातून शेतकरी आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी बैल, गाई, महशी ,व बक-या खरेदी व विक्री करण्यासाठी येतात, प्रवास दूरचा असल्याने त्यांना जनावरे पायदळ आनने शक्य नसलयाने त्यांना मालवाहू वाहनातून जनावरे आनावे लागते, विविध विषयांनी शेतकरी वर्ग त्रस्त झालेला आहे, कापसाला भाव नसल्याने त्यांना मजबूरीने बक-या गाई, बैल विकण्याची त्यांचेवर पाळी आली, काही शेतकरी कर्जाला कंटाळून आत्महत्या करीत आहे, शेतक-याची अशी वाईट अवस्था असतांना गडचांदुर येथील ट्राफिक पोलीस आठवडी बाजारात येणा-या शेतकऱ्यां ना कायदयाचा धाक दाखवून पैसे ऊकळणयाचा प्रयत्न करीत आहे,,गडचा़दुर शहरात अपघात होऊ नये व गर्दीच्या ठिकाणी गोंधळ माजू नये वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावे यासाठी ट्राफिक पोलीसांना मा, ठानेदार साहेबांन गडचांदुर शहरातील ट्राफिक नियंत्रणात ठेवण्या साठी तैनात केले आहे, काही दिवसा पूर्वी बसस्थानक परीसरात अनेकदा अपघात झाले असून ट्राफिक पोलीस शिपाई हे आपले कर्तव्य प्रामाणिक पणे बजावत नसून कर्तव्यात् कसूर करीत आहे व शेतकऱ्यांकडून व मालवाहु वाहन चालकांकडून अवैध रितीने व गैर मार्गाने भरदिवसा पैशाची वसूली करीत आहे, या नियमबाहय वसुलीमुळे शेतकरी वर्गात पोलीसाविषयी भीतीचे वातावरण पसरले आहे, कायदयाच्या भीती पोटी एकही शेतकरी किवा वाहन चालक पोलीसाच्या विरोधात बोलायला तयार नाही, कायदयाचे पालन करणारेच जर कायदा मोडत असेल तर न्याय कुणाकडे मागायचा असा गंभीर प्रशन्न नागरीकांपुढे उभा ठाकला आहे, कायदयाचे धाक दाखवून नियम धाब्यावर ठेऊन अवैध मार्गाने शेतक-यांन कडून वसुली करणा-या ट्राफिक पोलीस शिपाया कडून होणारी शेतकऱ्यांची लुट थांबली पाहीजे, याकडे मा, ठानेदार साहेबानी जातीने लक्ष देण्याची गरज आहे अन्यथा शेतकरी संघटना लवकरच आंदोलनाचा पवित्रा घेईल असा इशारा शेतकरी संघटनेचे सरचिटणीस तथा माजी ग्राम पंचायत सदस्य संतोष पटकोटवार यांनी संबंधित विभागाला दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here