


✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995469
उमरखेड(दि. 27 मार्च):/महागाई, बेरोजगारी, खाजगीकरण, अदाणी प्रकरणांची चौकशी व भ्रष्टाचार इत्यादी जनसामान्यांच्या समस्यांना वाचा फोडणारे व हे प्रश्न लाऊन धरल्यामुळे मोदी सरकारची नाचक्की होत होती. म्हणुन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करुन लोकशाही व्यवस्थेची हत्या केंद्र सरकार ने केली आहे.
सदर घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी उमरखेड तहसिल प्रागणात महाविकास आघाडीच्या वतीने निदर्शने करण्यात आली.
तहसिलव प्राग्णातुन संजय गांधी चौक मध्ये रस्ता रोको आदोलन करून मोदी सरकार जाहीर निषेध करण्यात आला.यावेळी महाविकास आघाडी चे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.













