


✒️रोशन मदनकर(उप संपादक)
ब्रम्हपूरी (दि.27 मार्च):-अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेर कृषि उत्पन्न बाजार समितिच्या निवडणुकीचे वारे जोरात सुरू झाले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयातून सहाय्यक निबंधक सहकारी संस्था ब्रम्हपुरी यांचा कृषि उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक सन 2022-23 ते 2027-28 चा निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे.
या जाहिर झालेल्या निवडणुक कार्यक्रमाची तात्काळ दखल घेऊन ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार प्रा.अतुलभाऊ देशकर यांनी तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठकीचे आयोजन करून निवडणूकीत कोणतीही कसर होणार नाही. याची खबरदारी म्हणून कार्यकर्त्यांची बैठक घेऊनयाबाबत विस्तृत चर्चा केली.आणि उमेदवारांची चाचपणी करण्यात आली.
अतुलभाऊ देशकर यांचें नेतृत्वात घेण्यात आलेल्या या बैठकीला तालुकाध्यक्ष प्राचार्य अरुण शेंडे, माजी जि. प. उपाध्यक्ष क्रिष्णा सहारे, शहराध्यक्ष इंजीनियर अरविंद नंदूरकर, भाजपा ओबीसी आघाडीचे शहराध्यक्ष डॉ. अशोक सालोटकर,भाजयुमो तालुकाध्यक्ष रामलाल दोनाडकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डॉ. गोकुल बालपांडे, भाजपा जिल्हा सचिव मानिक पा. थेरकर, आदिवासी आघाडीचे तालुकाध्यक्ष राजेश्वर मगरे, भाजपा महामंत्री मनोज वठे, भाजपा शहर महामंत्री मनोज भुपाल,माजी पं.स. सदस्य नरेंद्र दुपारे, माजी सरपंच योगेश राऊत, माजी सरपंच मनोज ढवळे, विनोद कावळे, उप सरपंच तथा माजी उपसभापति नामदेव लांजेवार, सरपंच अनिल तिजारे, भाजपा युवा नेता द्यानेश्वर दिवटे इत्यादिंच्या प्रमुख उपस्थितीत कृषि उत्पन्ना बाजार समितीच्या निवडणुकीचे नियोजन आणि रणनीति आखण्यात आली.













