Home महाराष्ट्र विविध विभागातील कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपासाठी हजारो बाईक रॅलीने नागभिड शहर गजबजले

विविध विभागातील कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपासाठी हजारो बाईक रॅलीने नागभिड शहर गजबजले

156

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

नागभिड (दि.16मार्च):-दि.14 मार्च 2023 पासून सुरु असलेल्या राज्य शासन कर्मचारी यांचा संपात नागभिड तालुक्यातील हजारो कर्मचारी संपात सामील झाले, आहेत, संपकरी यांची नागभिड शहरातून टुव्हिलर बाईकची रॅली काढण्यात आली, रॅली पंचायत समीती येथून सूरु होऊन तहसील कार्यालय नागभिड येथे रॅलीचे रुपातंर सभेत झाले, सर्व भागातील कर्मचारी संघटना चे विविध कर्मचारी यांचे संपाबाबत मनोगत व्यत केले.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा या प्रमुख मागणीसाठी व इतर प्रलंबीत मागण्यांसाठी कर्मचारी संघटनेच्या राज्यव्यापी संपाचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्याचाच एक भाग म्हणून नागभीड तालुक्यातील विविध कर्मचारी संघटना या संपात सहभागी होऊन नागभीड तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी शासन धोरणांविषयी घोषणाबाजी करून रोष व्यक्त करण्यात आला.या राज्यव्यापी संपातील प्रमुख मागण्यांमध्ये एनपीएस रद्द करून १ नोव्हेंबर 2005 रोजी व त्यानंतर नियुक्त सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना 1982 व 1984 ची योजना पूर्ववत लागू करा,या व्यतिरिक्त इतर मागण्यांचा सुद्धा समावेश आहे.

नागभीड येथील धरणे आंदोलनामध्ये तालुक्यातील विविध सरकारी राज्य कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी , नगरपरिषद अंशकालीन कंत्राटी रोजंदारी कर्मचारी सहभागी झाले होते. विशेष म्हणजे महिला कर्मचाऱ्यांची उपस्थिती उल्लेखनीय होती.या बाईक रॕली मध्ये नागभिड तालुक्यातील सर्व राज्य कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी ,शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी व सर्व विभागातील संपूर्ण कर्मचारी,शिक्षक -शिक्षकेत्तर कर्मचारी,महाविद्यालयीन प्राध्यापक ,नगरपरिषद कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सूनियोजीत व शिस्तबद्ध पध्दतीने काढण्यात आलेल्या या रॕलीचा समारोप मृत कर्मचाऱ्यांना श्रध्दांजली देऊन करण्यात आला. रॕली यशस्वी करण्यात सर्व कर्मचाऱ्यांचा सिंहाचा वाटा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here