


✒️सिद्धार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466
उमरखेड(दि.17 जानेवारी):-गोपिकाबाई सिताराम गावंडे महाविद्यालय , उमरखेड येथील राष्ट्रीय सेवा योजना वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालय व परिवहन विभाग यवतमाळ यांचे कडून विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा सप्ताह अंतर्गत मार्गदर्शन शिबिर आयोजन करण्यात आले. राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह हा भारतातील एक महत्त्वाचा कार्यक्रम आहे जो रस्ता सुरक्षेच्या महत्त्वाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि भारतीय रस्त्यांवरील अपघात आणि मृत्यूची संख्या कमी करण्यासाठी उपाययोजनांना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित केला जातो.
मार्गदर्शक म्हणून मा. श्री. संदीप येल्लाराव मुखे, मोटार वाहन निरीक्षक ,परिवहन विभाग यवतमाळ, मा. श्री. दिव्येश उबाळे, सहायक मोटार वाहन निरीक्षक परिवहन विभाग यवतमाळ, मा. श्री. गंगाधर मेकलावर,सहायक मोटार वाहन निरीक्षक परिवहन विभाग यवतमाळ व मा. श्री. सतीश खेडेकर वाहतूक शाखाप्रमुख , उमरखेड उपविभाग उपस्थित होते व त्यांनी रस्ता सुरक्षा सप्ताह व अमलात येणाऱ्या विविध नियमांची माहिती दिली जसे सप्ताहातील प्रमुख उपक्रम, अवजड वाहनांच्या चालकांचा थकवा कमी करण्यासाठी व त्यांच्यामध्ये रस्ता सुरक्षेबद्दल जागृती करण्यासाठी टोल नाका व इतर ठिकाणी उपक्रम, ट्रक आणि ट्रॅक्टर ट्रॉलीच्या मागील बाजूस लाल दिवा किंवा रेट्रो रिफ्लेक्टिव्ह टेप तपासणी, चुकीच्या बाजूनं वाहन चालवणे, ओव्हरलोडिंग थांबविण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावर विशेष मोहीम, पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी स्वयंसेवी संस्थांचा सहभाग, चालकांसाठी नेत्र तपासणी शिबिरे व विद्यार्थ्यांसाठी उपयोगात येणारे नियम सांगितले व त्यासोबत वेगवेगळ्या प्रकारचे पोम्प्लेट, नियमावली, छायाचित्र विद्यार्थ्यांना वाटण्यात आले.
या कार्यशाळेसाठी कनिष्ठ महाविद्यालयातील प्रा. प्र. म. गुजर, प्रा. बा.ऊ. लाभशेटवार, प्रा. ग. बा. जाधव, प्रा. डी. एस. शिंदे,प्रा. व्ही. बी. कनवाळे, प्रा. कु.एन.ए. ठाकरे, प्रा. एम. एम. कांबळे, प्रा. पी. बी. देशमुख, प्रा. पी. पी. शिंदे, प्रा. एस. के. बिचेवार, प्रा. ए. व्ही. मोरे, प्रा. एस. पी. चिंचोलकर, कु. एस. बी. भूतडा, प्रा. ए. जे. सुर्यवंशी यांचे विशेष सहकार्य होते व त्यामुळे कार्यशाळेची शोभा वाढविण्यास मदत झाली.
या शिबिरात राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ.पी.वाय. अनासाने व राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थ्यांनी अतिशय प्रामाणिकपणे काम केले तसेच या शिबिराला स्वयंसेवकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद होता.
महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय माधवराव कदम यांनी विद्यार्थ्यांना ट्रॅफिक नियमांची व रस्त्यावर चालताना कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी याबद्दल सखोल मार्गदर्शन केले त्यासोबतच कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. बा. ऊ. लाभशेटवार यांनी हा सर्व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी विशेष योगदान दिले.
कु. कांचन गजानन जाधव या विद्यार्थिनीने सूत्रसंचालन केले व कु. शिवानी पुरुषोत्तम राठोड या विद्यार्थिनीने आभार प्रदर्शन केले. अमित केंद्रेकर व आतिश खिल्लारे या स्वयंसेवकांचे विशेष योगदान होते.
अशा प्रकारचे वेगवेगळे शिबिर महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना मार्फत राबविण्यात येतात, यापूर्वी जागतिक एडस् दिनानिमित्त विद्यार्थ्यांना मार्फत भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयात परिसरात विविध उपक्रम, यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाज, यवतमाळ संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री.रामसाहेब देवसरकर व सचिव माननीय श्री. डॉ. यादवराव राऊत साहेब तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधवराव बा.कदम यांच्या मार्गदर्शनाखाली घेतले जात आहेत.













