Home महाराष्ट्र तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात वेदावती हायस्कूलचे घवघवीत यश

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात वेदावती हायस्कूलचे घवघवीत यश

262

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.17जानेवारी):-पुसेगाव ता.खटाव येथील हनुमानगिरी हायस्कूल येथे १२ ते १४ जानेवारी २०२३ रोजी झालेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात वेदावति हायस्कूल, खातगुन, ता.खटाव, जि.सातारा येथील शाळेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले

वाळवा तालुका बौद्ध सोसायटीचे वेदावती हायस्कूल खातगुन या शाळेतील इयत्ता आठवीत शिकत असलेला बाल वैज्ञानिक एजाज सादिक मुल्ला या विद्यार्थ्याने बनविलेल्या रूम हिटर या उपकरणाला तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक मिळाला त्याने बनविलेल्या उपकरणाची जिल्हा स्तरीय विज्ञान प्रदर्शनात निवड करणेत आली यावेळी या प्रदर्शनासाठी १३० प्राथमिक आणि माध्यमिक शाळांचा समावेश होता.

हे उपकरण बनविण्यासाठी एजाज मुल्ला याला त्याच्याबरोबर शिकत असलेल्या आर्यन प्रमोद भोसले व शिवम विठ्ठल पवार यांचे सहकार्य लाभले.१४ जानेवारी रोजी आ.महेश शिंदे यांचे हस्ते हनुमान गिरी हायस्कूल येथे यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करणेत आले.

या विज्ञान प्रदर्शनासाठी एजाज मुल्ला याला शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.आर.एस.देसाई मॅडम,विज्ञान शिक्षक श्री. व्हीं के शिंदे सर,शाळेतील इतर शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.यावेळी एजाज मुल्ला या विद्यार्थ्याला मिळालेल्या यशाबद्दल वाळवा तालुका बौद्ध सोसायटीचे अध्यक्ष,सचिव व इतर पदाधिकारी,पालक आणि ग्रामस्थानी त्याचे अभिनंदन आणि कौतुक केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here