Home महाराष्ट्र बबनराव गिरी यांना हरिनाम सप्ताहात आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

बबनराव गिरी यांना हरिनाम सप्ताहात आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

108

✒️अहिल्यानगर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

अहिल्यानगर(दि.30मे):- माध्यमिक शिक्षक श्री.बबनराव बाबुराव गिरी यांना श्री.नवनाथ वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने 2026 चा आदर्श शिक्षक पुरस्कार हभप विकासानंद मिसाळ महाराज यांच्या शुभहस्ते निमगाव वाघा येथील हरिनाम सप्ताहामध्ये प्रदान करण्यात आला.

         श्री बबनराव बाबुराव गिरी यांनी शैक्षणिक, सामाजिक , साहित्यिक तसेच अध्यात्मिक क्षेत्रातील केलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल, समाजाचे एक पहारेकरी,जागरूक नागरिक म्हणून भूमिका बजावली व सत्वर कर्तव्य बजावत असल्याची जाणीव ठेऊन आपले विद्यार्थी घडवत आहेत. आत्तापर्यंत त्यांचे अनेक विद्यार्थी एमपीएससी द्वारे शासकीय सेवेमध्ये सहभागी झालेले आहेत, ग्रामीण भागात ते प्रवचनाच्या माध्यमातून धार्मिक कार्यामध्ये सक्रिय सहभागी आहेत. या बहुमोल कार्याची दखल घेऊन श्री.नवनाथ वारकरी शिक्षण संस्था चे अध्यक्ष हभप विठ्ठल महाराज फलके, आदर्श गाव निमगाव वाघा यांच्या पुढाकारातून हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी

हिवरा येथील सोमनाथ अमृत महाराज,सत्यप्रेम गिरी इत्यादी मान्यवर उपस्थित होते. 

   बबनराव गिरी यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल शब्दगंध साहित्यिक परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र उदागे, मोहटादेवी ट्रस्टचे माजी सदस्य श्रीधर गिरी गुरुजी, माजी पोलीस निरीक्षक अनिल भारती, मजले चिंचोली विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे संचालक गोरक्षनाथ गिरी, अरुणा गिरी महाराज यांनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here