


✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)
चिमूर(दि.30एप्रिल):-ग्रामगीता महाविद्यालय चिमूर येथे, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 च्या अंमलबजावणीस औचित्य साधून, “सेवा हक्क दिन” उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाची प्राचार्य डॉ. सुनंदा आस्वले तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. सुशीला गजभिये, डॉ. निलेश ठवकर आणि डॉ. बिजनकुमार शील उपस्थित होते. पाहुण्यांनी विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांच्या मार्गदर्शन करत असताना महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015, हा कशाप्रकारे इतर राज्यांच्या तदानुषंगिक कायद्यांपेक्षा वेगळी व उत्तम आहे हे समजावून सांगितले.
तसेच आपल्या अध्यक्षीय भाषणेत डॉ. सुनंदा आस्वले यांनी आपण कर्मचारी/ अधिकारी म्हणून नागरिकांची सेवा करत असताना, लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 अंतर्गत पारदर्शकता, उत्तरदायित्व, कालबद्धता आणि कार्यक्षमता या गोष्टींच्या महत्व पटवून सांगितले. या कार्यक्रमात महाविद्यालयाचे सर्व कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांना सेवा हक्काबाबत शपथ देण्यात आली.














