


✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)
चिमूर(दि.30एप्रिल):- वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ११७ वी जयंती अर्थात ग्रामजयंती न्यू राष्ट्रीय विद्यालय चिमूर येथे उत्साहाने साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष पर्यवेक्षक उज्ज्वल नव्हाते तर प्रमुख अतिथी सॊ.शिल्पाताई ढाकुणकर,जेष्ठ शिक्षक राजेंद्र मोहितकर हे होते.
सर्वप्रथम वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण प्रमुख अतिथी सॊ.शिल्पाताई ढाकुणकर व शाळेतील सर्व महिला शिक्षिकांनी केले.त्यानंतर पर्यवेक्षक उज्ज्वल नव्हाते व सर्व पुरूष शिक्षकांनी केले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या भजनाच्या कार्यक्रमात ” निघू दे दिवस मंगल तो बघाया भारता तुजला” हे भजन त्याकाळी राष्ट्रसंतानी म्हटले होते.या भजनातील एक वाक्य ” मिळो बहुमान मातांना,जसा देशात पुरूषांना” असे आहे.” त्यावेळेस भारताच्या माजी राष्ट्रपती मा. सॊ.प्रतिभाई पाटील हजर होत्या.त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना प्रश्न केला होता की,असे घडेल काय? त्यावर ते म्हणाले,का नाही? होय घडेल.
मा.सॊ.प्रतिभाताई पाटील त्यानंतर अनेक वर्षांनी भारत देशाच्या राष्ट्रपती झाल्या अशी एक अविस्मरणीय आठवण जेष्ठ शिक्षक राजेंद्र मोहितकर यांनी सांगितली.
या कार्यक्रमासाठी देवानंद मेश्राम, डाॅ.अश्विनी रोकडे,प्रशांत लढी,घनश्याम गायधनी,वॆष्णवी बोढे,कविता गुरू,विनोद खमिले,रामप्रसाद श्रीरामे,तुषार शंभरकर,चॊधरी,नागोसे,आशिष वरखेडे,स्वप्नील बिरजे,विद्या रामटेके,विलास भजभुजे,अमोल येरमे,भारशंकर इ.उपस्थित होते.














